महेंद्रसिंह धोनीची Garuda Aerospace मध्ये गुंतवणूक, बनला कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर
Mahendra singh Dhoni Update: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चेन्नई येथील ड्रोन कंपनी गरुडा एरोस्पेसमध्ये गुंतवणूक केली आहे.
![महेंद्रसिंह धोनीची Garuda Aerospace मध्ये गुंतवणूक, बनला कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर MS Dhoni invests in startup drone company Garuda Aerospace, becomes the company's brand ambassador.1 महेंद्रसिंह धोनीची Garuda Aerospace मध्ये गुंतवणूक, बनला कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/1245b6e51888e3712054a8451f3b033b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mahendra singh Dhoni Update: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चेन्नई येथील ड्रोन कंपनी गरुडा एरोस्पेसमध्ये गुंतवणूक केली आहे. माहीने या कंपनीत किती गुंतवणूक केली आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. गरुडा एरोस्पेसचा गुतंवणूकदार धोनी हा या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील असणार आहे.
Garuda Aerospace चे संस्थापक अग्निश्वर जयप्रकाश म्हणाले की, महेंद्रसिंग धोनीने कंपनीत गुंतवणूकदार आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र धोनीने या कंपनीत किती गुंतवणूक केली आहे, हे त्यांनी सांगितलं नाही. ते म्हणाले की, कंपनी जुलै अखेरपर्यंत 30 मिलियन डॉलर्सची रक्कम उभारणार आहे. ज्यामुळे कंपनीला 250 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 2,000 कोटी रुपयांचे मूल्यांकन मिळण्याची अपेक्षा आहे.
ड्रोन आधारित सेवा देते कंपनी
2015 मध्ये ड्रोन क्षेत्राशी संबंधित गरुडा एरोस्पेस ही स्टार्टअप कंपनी सुरू झाली. कंपनी ड्रोन सेवेवर आधारित सोल्यूशन्स पुरवते. याव्यतिरिक्त, कंपनीने स्वच्छता, कृषी स्प्रे, मॅपिंग, उद्योग, सिक्युरिटीज आणि पाळत ठेवणे (Surveillance) यासारख्या 38 अनुप्रयोगांसाठी ड्रोन डिझाइन केले आहेत. गेल्या वर्षी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनीही ट्वीट करून कंपनीच्या ऑपरेशनल क्षमतेची प्रशंसा केली होती.
HomeLane मध्ये धोनी आहे भागीदार
महेंद्रसिंह धोनी ( Mahendra Singh Dhoni) होम इंटिरिअर स्टार्टअप कंपनी होमलेनशीही ( HomeLane) संबंधित आहे. होमलेनची सुरुवात 2014 मध्ये श्रीकांत अय्यर आणि तनुज चौधरी यांनी केली होती. ही कंपनी घरातील इंटिरियर सोल्यूशन्स पुरवते. होमलेनने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये महेंद्रसिंह धोनीला पार्टनरसोबत ब्रँड अॅम्बेसेडर बनवले होते. धोनी हा कंपनीचा पहिला ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
LIC Share Price : टेन्शन वाढलं, एलआयसीचा शेअर 800 रुपयांखाली; गुंतवणुकदारांना एक लाख कोटींचा फटका
Jan Samarth Portal : झटपट मिळणार ऑनलाइन कर्ज; पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेले 'जन समर्थ पोर्टल' आहे तरी काय?
Home Loan: कमी दरावर मिळू शकतं गृह कर्ज; जाणून घ्या या योजनेची माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)