एक्स्प्लोर

Jan Samarth Portal : झटपट मिळणार ऑनलाइन कर्ज; पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेले 'जन समर्थ पोर्टल' आहे तरी काय?

Jan Samarth Portal : केंद्र सरकारच्या विविध योजना आणि त्यासाठी लागणारे कर्ज आता एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन समर्थ पोर्टलचे उद्घाटन केले आहे.

Jan Samartha Portal : केंद्र सरकारने नागरिकांसाठी एक खास पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना आणि या योजनांनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले असून जन समर्थ पोर्टल असे या पोर्टलचे नाव आहे. या पोर्टलमुळे विविध सरकारी कार्यालयात नागरिकांना सारख्या चक्करा माराव्या लागणार नाहीत. 

केंद्र सरकारच्या चार कर्ज श्रेणीतील 13 योजना जन समर्थ पोर्टलवर उपलब्ध आहे. तर, 125 हून अधिक कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था या पोर्टलवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पोर्टलचे कौतुक केले असून युवकांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. स्टार्ट अप इंडिया, मुद्रा लोन कोणत्या योजनांतून कर्ज घ्यायचे हे युवकांना निश्चित करता येणार आहे. कर्जासाठी कमी प्रक्रिया होणार असून अधिकाधिक जणांना कर्ज मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  स्वयंरोजगार वाढवण्यासाठी, सरकारच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहचवण्यासाठी हे पोर्टल मोठी भूमिका बजावेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. 

NSDL, आयकर विभाग, UIDAI इत्यादी सरकारी संस्था देखील या पोर्टलवर जोडल्या जातील. यामुळे डेटाची डिजिटल पडताळणी करणे अधिक सोपे होईल आणि कर्जदारांना होणारा त्रास कमी होईल. कर्ज घेणारे लाभार्थी एकाच ठिकाणी वेगवेगळ्या ऑफर्स पाहून त्यांच्या आवडीनुसार पर्याय निवडू शकतील. केंद्र सरकारची , 8 पेक्षा जास्त मंत्रालये, 10 पेक्षा जास्त नोडल एजन्सी आणि 125 हून अधिक कर्जदार एकाच वेळी या पोर्टलवर आहेत. 

जन समर्थ पोर्टल म्हणजे काय?

जन समर्थ हे एक डिजिटल पोर्टल आहे जिथे 13 क्रेडिट लिंक्ड सरकारी योजना एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. डिजीटल पद्धतीने लाभार्थी आपली पात्रता तपासू शकतात. पात्र योजनांमध्ये डिजिटल  अर्ज करता येऊ शकतो.

अर्ज कसा करावा?

सध्या चार कर्जाच्या श्रेणी आहेत. प्रत्येक कर्ज श्रेणीत सरकारच्या काही योजना आहेत. अर्ज करताना काही सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्यानुसार योजनेतंर्गत तुमची पात्रता तपासली जाईल. 

कोणत्या दस्ताऐवजांची गरज आहे?

प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळ्या दस्ताऐवज, कागदपत्रांची आवश्यकता आहे. पोर्टलवर अर्ज करण्यासाठी साधारणपणे आधार क्रमांक, मतदार क्रमांक, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट आदींचा समावेश आहे. अर्जदाराला पोर्टलवर आणखी काही माहिती नमूद करावी लागेल. 

कोणीही अर्ज करू शकतो का?

कोणताही भारतीय अर्ज करू शकतो. मात्र, कर्जाच्या श्रेणीत तुम्हाला पात्रता तपासावी लागणार आहे आणि जर तुम्ही संबंधित योजना, कर्जासाठी पात्र  असाल तर ऑनलाइन माध्यमातून कर्जासाठी अर्ज करू शकता. 

अर्जाची स्थिती कशी पाहावी?

अर्जदार वेब पोर्टलवर आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकतो. नोंदणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून साइन-इन करावे. अर्जाची स्थिती पाहण्यासाठी डॅशबोर्डवर माय अॅप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करा. 

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
Embed widget