एक्स्प्लोर

मत्स्यव्यवसाय विकासासाठी 3 हजार कोटी रुपयांचा निधी 30 हजार कोटींवर, मत्स्यव्यवसाय विभागाचे विविध संस्थांसोबत सामंजस्य करार

मत्स्यव्यवसाय विकासासाठी महाराष्ट्रात खूप मोठी संधी आहे. या क्षेत्रात काम करण्याऱ्या केंद्रीय संस्थांबरोबर मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार झाला आहे.

Fisheries Department : महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विकासासाठी येथे खूप मोठी संधी आहे. या क्षेत्रात काम करण्याऱ्या केंद्रीय संस्थांबरोबर मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे राज्याच्या सागरी, निमखारेपाणी व भूजल क्षेत्रातील मत्स्योत्पादन वाढ व निर्यातीला चालना मिळणार असल्याची माहिती वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली. मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी 3 हजार कोटी रुपयांचा निधी 30 हजार कोटी रुपयांवर नेला असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. 

सागरी मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा देशात 6 वा  क्रमांक

सध्या आपल्या राज्याचा सागरी मत्स्य उत्पादनामध्ये देशात 6 वा  क्रमांक तर भूजल मत्स्य उत्पादनामध्ये 17 वा क्रमांक आहे. पूर्वी दुर्लक्षित असलेला हा विभाग  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र विभागाचा दर्जा देऊन 3 हजार कोटी रुपयांचा निधी 30 हजार कोटी रुपयांपर्यंत नेला आहे. त्यामुळं या क्षेत्रात मूलभूत काम होण्याची गरज त्यांनी व्यक्त केल्याचे मुगगंटीवार म्हणाले. मत्स्यशेती संदर्भात विविध संशोधन संस्थांमध्ये होत असते. ते संशोधन मच्छिमार आणि नागरिकांपर्यंत पोहोचले. तरच त्या संशोधनाचा खऱ्या अर्थाने लाभ सर्वांना होऊ शकेल, असे  मुनगंटीवार म्हणाले. मत्स्य विकासासाठी या सर्व संस्थांनी मिळून काम केले तर राज्याची या क्षेत्रातील निर्यात 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल. त्यादृष्टीने आता काम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पर्यावरण संतुलनासाठी या क्षेत्राच्या अनुषंगाने जे बदल आहेत, ते केले गेले पाहिजेत. त्यासाठी नियमांचा अडथळा येणार नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.

कोणत्या ठिकाणी काय होणार?

मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सागरी, निमखारेपाणी आणि भूजल क्षेत्रातील मत्स्योत्पादन वाढ व निर्यातीला चालना मिळण्याकरीता भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) च्या विविध संस्थांसमवेत मत्स्यव्यवसाय विभागाने सामंजस्य करार केले. यामध्ये केंद्रीय खारा जलजीव पालन अनुसंधान संस्थान, चेन्नई (ICAR- CIBA), केंद्रीय मत्स्यिकी शिक्षण संस्थान (ICAR-CIFE), केंद्रीय गोडेपाणी मत्स्य संवर्धन संस्था (ICAR- CIFA) या संस्थांचा समावेश आहे. केंद्रीय खारा जलजीव पालन अनुसंधान संस्थान, चेन्नई (ICAR- CIBA) बरोबर झालेल्या करारानुसार महाराष्ट्रातील निमखारे मत्स्य शेतीच्या विस्तारासाठी भौगोलिक सर्व्हेक्षण दापचरी, जि. पालघर येथे आशियाई सीबास या माशाची मिनी-हॅचरीची स्थापना करणे, निमखारे पाणी कोळंबी संवर्धन प्रकल्प, आसनगांव, ता. डहाणू, जि. पालघर येथे खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन (काळूंदर, खेकडा, जिताडा, मिल्क फिश) पथदर्शक प्रकल्प उभारणे. बाडापोखरण, ता. डहाणू, जि. पालघर येथे एकात्मिक कोळंबी बीज उत्पादन केंद्र उभारणे. मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे वन्य पी. इंडिकस कोळंबी प्रजनक संकलन केंद्र आणि बीज उत्पादन केंद्र स्थापना करणे. महाराष्ट्राच्या तटीय जिल्ह्याच्या किनारी भागात निमखाऱ्या पाण्यातील पिंजरा पध्दतीने मत्स्यपालन उभारणी करणे, जे.एन.पी.टी., शेवा, नवी मुंबई येथे जलचर प्राणी संसर्गरोध केंद्र आणि रोग निदान प्रयोगशाळाची स्थापना करणे, महाराष्ट्राच्या तटीय जिल्ह्यांमध्ये जिताडा, काळूंदर आणि मिल्क फिश या माशांची नर्सरी संगोपन केंद्र स्थापन करणे, महाराष्ट्राच्या तटीय जिल्ह्यात खेकडा पेटी/बॉक्स संगोपन केंद्र उभारणे आदींबाबत काम केले जाणार आहे.

मच्छिमारांकरिता व उद्योजकांकरिता कौशल्य विकास कार्यक्रम होणार

केंद्रीय मत्स्यिकी शिक्षण संस्थान (ICAR-CIFE) बरोबर झालेल्या करारानुसार मत्स्यव्यवसाय विषयक विविध विषयांचे लघु कालावधीचे विकसित अभ्यासक्रम तयार करणे. मत्स्यबीज प्रमाणन व मत्स्यबीज केंद्र प्रमाणिकरण प्रक्रिया राबविण्याकरीता पाणी तपासणी व मासळी रोगनिदान तपासणी करणे. सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत सरदार सरोवर जलाशयाचे सर्व्हेक्षण, महाराष्ट्रातील भूजलाशयीन क्षारपट क्षेत्राचे सर्व्हेक्षण  मत्स्य कातडीबाबतचे तंत्रज्ञान विकसित करणे आदींबाबत काम होणार आहे. केंद्रीय मत्स्यिकी प्रौद्योगिकी संस्थान, कोची (ICAR-CIFT) बरोबर झालेल्या करारानुसार विघटनशील मासेमारी जाळी विकसित करणे, मासेमारी नौकांसाठी पर्यायी इंधन व्यवस्था विकसित करणे, समुद्रामधील वापरात नसलेले, हरवलेले, फेकून दिलेल्या जाळ्यांचे मूल्यांकन करणे, संपूर्ण महाराष्ट्रातील मच्छिमारांकरिता व उद्योजकांकरिता कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करणे आदी कामे केली जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षणVinod Kambli Raj Thackeray : दोन मिनिटं थांबले, राज ठाकरे विनोद कांबळींना आवर्जून भेटलेVinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget