(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viva Engage : 'मायक्रोसॉफ्ट'ची 'मेटा'ला टक्कर, Facebook सारखा Viva Engage ॲप लाँच
Microsoft Viva Engage App : 'वीवा इंगेज' (Viva Engage) ॲप सोशल मीडिया नेटवर्किंगला (Social Media Networking) चालना देतो. या ॲपमध्ये Post, Video, Photo यासह स्टोरी शेअर करण्याचा पर्याय आहे. हे ॲप फेसबुकप्रमाणेच आहे.
Microsoft Viva Engage : मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनी आता मेटा (Meta) कंपनीला टक्कर देत आहे. यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने फेसबुक (Facebook) ॲपला पर्याय म्हणून नवीन 'वीवा इंगेज' (Viva Engage) ॲप लाँच केला आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनला (Microsoft Corporation) आपण कॉर्पोरेशन (Microsoft) या नावाने ओळखतो. आता मायक्रोसॉफ्टने नवीन सोशल मीडिया नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. हा ॲप फेसबुकप्रमाणे असल्याचं म्हटलं जात आहे.
फेसबुकला देणार टक्कर
मायक्रोसॉफ्ट कंपनीचा नवीन ॲप सोशल मीडिया नेटवर्किंगला (Social Media Networking) अधिक चालना देईल. 'वीवा इंगेज' (Viva Engage) ॲपला फेसबुकचा क्लोन ॲप म्हटलं जात आहे. 'वीवा इंगेज' (Viva Engage) ॲप संवाद (Comunication) साधण्यासाठी प्रोत्साहन देतो. या ॲपमध्ये पोस्ट (Post), वीडियो (Video), फोटो (Photo) शेअर करण्यासह स्टोरी (Story) शेअर करण्याचाही पर्याय देण्यात आलेला आहे. यामध्ये फेसबुकमधील (Facebook) न्यूज फीड (News Feed) पर्याय आहे.
कम्युनिकेशन हब बनवण्यासाठी प्रयत्न
कोरोनाकाळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्व गोष्टी करणं शक्य झालं. वर्क फ्रॉम होम करताना मायक्रोसॉफ्ट टीम्स (Microsoft Teams), झूम (Zoom), गूगल मीट (Google Meet) आणि स्लॅक (Slack) यांसारख्या ॲपची (Apps) गरज वाढली आहे. मायक्रोसॉफ्ट टीम्स (Microsoft Teams) ने एका कम्युनिकेशन हबची जागा घेतली आहे.
स्टोरी शेअर करता येणार
मायक्रोसॉफ्ट टीम्सने (Microsoft Teams) अनेक कंपन्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये संवाद साधण्यासाठी उत्तम व्यासपीठ तयार केलं आहे. यानंतर आता आणखी पुढे जात मायक्रोसॉफ्टने नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केलं आहे. Viva Engage मध्ये स्टोरी शेअर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. कर्मचारी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप प्रमाणेच मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि व्हिवा एंगेजमध्ये स्टोरी शेअर करू शकतील.
'मायक्रोसॉफ्ट टीम्स' डाऊन
मायक्रोसॉफ्ट टीम्स (Microsoft Teams) हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप आहे. मात्र, हे अॅप गुरुवारी (आज) हजारे यूजर्ससाठी डाऊन आहे. त्यामुळे यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या संदर्भात मायक्रोसॉफ्टने ही समस्या मान्य केली आहे आणि आऊटेजचे निराकरण करण्यासाठी काम सुरु आहे असे सांगितले आहे.