एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case: लेकी तक्रार देऊनही आरोग्य विभागाने दुर्लक्ष का केलं?
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप आहेत. पीडित डॉक्टरने वरिष्ठांना त्रास होत असल्याची लेखी तक्रार देऊनही कारवाई का झाली नाही, यावर अधीक्षक डॉक्टर अंशुमन धुमाळ म्हणाले, 'आमच्या कार्यालयात त्यांना पोलिस कर्मचारी त्रास देत आहेत असा उल्लेख आमच्याकडे केलेला नाही.' पीडित डॉक्टरने मृत्यूपूर्वी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये पीएसआय बदनेवर बलात्काराचा आणि बनकरवर मानसिक छळाचा आरोप केला आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. डॉक्टरवर वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी दबाव होता आणि त्यांनी जून महिन्यातच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दिली होती, असेही समोर आले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक झाली असून, पोलीस अधिकारी फरार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















