एक्स्प्लोर

Best seller Cars : कोरोना काळातही 'या' गाड्यांच्या विक्रीचा वेग थांबेना

या वर्षाच्या सहामाहीत सर्वात जास्त खरेदी केलेल्या पाच कार कोणत्या आहेत पाहुयात.

मुंबई : कोरोना संकटात वर्षभरात ऑटो सेक्टरला मोठा फटका बसला आहे. जवळपास प्रत्येक ब्रँडच्या गाड्यांच्या विक्रीत घट झाली आहे. परंतु बर्‍याच कार अशा आहेत ज्यांना फारसा फरक पडलेला दिसत नाही. कोरोना संकटाच्या काळातही काही कारची जोरदार खरेदी झाली. या वर्षाच्या सहामाहीत सर्वात जास्त खरेदी केलेल्या पाच कार कोणत्या आहेत पाहुयात.

मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)

विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकीची स्विफ्ट पहिल्या क्रमांकावर राहिली. या कारच्या या सहामाहीत आतापर्यंतच्या 97,312 युनिट्सची विक्री झाली आहे. या कारमध्ये नुकताच ड्युअल जेट के 12 इंजिनसह बदल करण्यात आला आहे. या कारची किंमत एक्स-शोरूम किंमत 5.73 लाख रुपयांपासून 8.40 लाख रुपयांपर्यंत आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)

दुसर्‍या क्रमांकावरही मारुती सुझुकीच्या कारने स्थान मिळवलं आहे. कंपनीच्या लोकप्रिय कार वॅगनआरने या सहामाहीत 94,839 वाहनांची विक्री केली. गेल्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये या कारची सर्वाधिक विक्री झाली आहे. मारुती सुझुकी वॅगन आरची किंमत 4.80 लाखांपासून 6.33 लाख रुपयांपर्यंत आहे.

मारुती सुझुकी बलेनो (Maruti SUzuki Baleno)

या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही मारुती सुझुकीची कार आहे. मारुती सुझुकीची बलेनो ही कंपनीची भारतात सर्वाधिक विक्री होणारी प्रीमियम हॅचबॅक कार आहे. कंपनीने आतापर्यंत या कारच्या 93,823 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली आहे. बलेनोची किंमत 5.98 लाखांपासून ते 9.30 लाख रुपयांपर्यंत आहे.

मारुती सुझुकी अल्टो 800 (Maruti suzuki Alto 800)

मारुती सुझुकी अल्टो 800 ही कार या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सन 2021 च्या निम्म्या कालावधीत आतापर्यंत या कारच्या 85,616 वाहनांची विक्री झाली आहे. कारची एक्स-शोरूम किंमत 2.99 लाख रुपयांपासून ते 4.60 लाखांपर्यंत आहे.

ह्युंदाई क्रेटा (Hyndai Creta)

मारुती सुझुकीनंतर ह्युंदाईची क्रेटा ही कार या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ही कार कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. यावर्षी आतापर्यंत कंपनीने क्रेटाच्या 67,283 युनिट्सची विक्री केली आहे. या क्रेटा कारची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून 17.70 लाख रुपयांपर्यंत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Santosh Deshmukh | संतोष देशमुख प्रकरणाची केस उज्ज्वल निकम लढवणार? -फडणवीसJob majha : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात नोकरीची संधी, अटी काय?Sunil Tatkare PC | वाल्मिक कराड अजित पवारांच्या कारमध्ये होता का? सुनील तटकरे म्हणाले...Chhagan Bhujbal : माझ्यासाठी कुणाचं तरी मंत्रीपद काढून घेणं मला पटत नाही : छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Chhagan Bhujbal : तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी मांडत छगन भुजबळांचं मंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य
कुणाचं काढून मला मंत्रिपद नकोय, विदेशातून नाशिकमध्ये येताच छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Embed widget