Marriage season : 23 दिवसात देशात होणार 'एवढी' लाख लग्न, प्रत्येक सेकंदाला होणार 21.37 लाख रुपये खर्च
देशात लग्नाच्या हंगामात अब्जावधी रुपयांचा व्यवसाय होतो. भारतात लग्नाच्या हंगामात 4.25 लाख कोटी रुपये खर्च होतात. दिवाळीचा सण झाला आहे. यावर्षी फक्त 23 दिवसांचा लग्नाचा सीझन आहे.
Marriage season : दिवाळीचा सण झाला आहे. या दिवाळीच्या सणानंतर लग्नाचा हंगाम सुरु होतो. लग्नाआधी लोक कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत भरपूर खरेदी करतात. ही खरेदी केवळ वधू-वरांसाठी नसते तर लग्नाला येणारे लोकही मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. यामुळेच देशात लग्नाच्या हंगामात अब्जावधी रुपयांचा व्यवसाय होतो. भारतात लग्नाच्या हंगामात 4.25 लाख कोटी रुपये खर्च होतात. दिवाळीनंतर फक्त 23 दिवसांचा लग्नाचा सीझन आहे. या काळात देशात देशात प्रत्येक सेकंदाला 21.37 लाख रुपये खर्च होणार आहेत.
देशात 35 लाखांहून अधिक विवाह होणार
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा अंदाज आहे की, 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत एकूण विक्री सुमारे 4.25 ट्रिलियन रुपये (51 अब्ज डॉलर) असेल. म्हणजेच या कालावधीत प्रत्येक सेकंदाला लग्नाच्या खरेदीवर 21.37 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या हंगामात, लोक लग्नाच्या खरेदीवर प्रत्येक सेकंदाला सरासरी 21 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करू शकतात. नोव्हेंबरच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत देशात 35 लाखांहून अधिक विवाह होणार आहेत.
4.25 लाख कोटींची उलाढाल
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ कुमार राजगोपालन यांनी दागिने, कपडे, शूज आणि डिझायनर कपडे यांसारख्या लग्नाच्या खर्चाशी संबंधित व्यवसाय विक्री नोव्हेंबर ते जानेवारी अखेरीस 8 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यंदा महागाईचा फटका बसला असला तरी हंगामाच्या पहिल्या आठवड्यात चांगला व्यवसाय अपेक्षित आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा अंदाज आहे की 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत एकूण विक्री सुमारे 4.25 ट्रिलियन रुपये (51 अब्ज डॉलर) असेल. म्हणजेच या कालावधीत प्रत्येक सेकंदाला लग्नाच्या खरेदीवर 21.37 लाख रुपये खर्च केले जातील. या काळात सोने, भेटवस्तू देणे शुभ मानले जाते. कुटुंबे त्यांच्या लग्नाच्या बजेटचा मोठा भाग दागिन्यांवर खर्च करतात.
देशात सोन्याची वार्षिक मागणी सुमारे 800 टन
देशात सोन्याची वार्षिक मागणी सुमारे 800 टन आहे. त्यातील निम्म्याहून अधिक खरेदी लग्नासाठी केली जाते. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेला देश आहे. टायटन कंपनीच्या तनिष्क, सेन्को गोल्ड लिमिटेड, त्रिभोवन दास भीमजी झवेरी लिमिटेड आणि कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड यांना या काळात सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे.
वाढत्या किंमतीचा खरेदीवर परिणाम होणार नाही
मेटल्स फोकस लिमिटेडचे प्रमुख सल्लागार चिराग शेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली असेल. इस्रायल-हमास युद्धामुळं किंमती वाढल्याने लग्नाच्या दागिन्यांच्या मागणीवर फारसा परिणाम होणार नाही. भारतीय लोक लग्नाच्या दागिन्यांसाठी महिनोन्महिने बचत करतात. किमती दोन टक्के किंवा तीन टक्के वाढल्या तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या: