महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या तिमाहीत केली बंपर कमाई, कमावला 5 पट नफा
Mahindra & Mahindra's Q4 Result: महिंद्रा अँड महिंद्राने चौथ्या तिमाहीचे (M&M Result) निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला चांगला नफा झाला आहे.
Mahindra & Mahindra's Q4 Result: महिंद्रा अँड महिंद्राने चौथ्या तिमाहीचे (M&M Result) निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला चांगला नफा झाला आहे. आर्थिक वर्ष 2021-22च्या चौथ्या तिमाहीत स्टेंडअलोन आधारावर देशांतर्गत ऑटोमेकर महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) चा नफा जवळपास दुपटीने वाढून 1,192 कोटी रुपये झाला आहे.
कंपनीने जारी केले निवेदन
कंपनीने शनिवारी एका निवेदनात सांगितले की, एका वर्षापूर्वी याच कालावधीत कंपनीचा नफा 245 कोटी रुपये होता. अशाप्रकारे जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाहीत कंपनीचा एकल नफा जवळपास पाचपट झाला आहे.
महसुलात 28 टक्के वाढ
कंपनीचा महसूलही या तिमाहीत 28 टक्क्यांनी वाढून 17,124 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 13,356 कोटी होता. आर्थिक वर्ष 2021-22 च्या संपूर्ण वर्षासाठी कंपनीचा स्वतंत्र आधारावर नफा जवळजवळ पाचपट 4,935 कोटी रुपये आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात ते 984 कोटी रुपये होते.
महसूल विक्रमी पातळीवर पोहोचला
M&M ने म्हटले आहे की 2021-22 मध्ये त्यांच्या वाहन आणि शेती उपकरणे विभागांना एकूण 55,300 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, जो कोणत्याही आर्थिक वर्षातील महसुलाची सर्वोच्च पातळी आहे. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 29 टक्के अधिक आहे.
कंपनीचे सीईओ म्हणाले...
कंपनीने मागील आर्थिक वर्षात वाहन निर्यातीत 77 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यावेळी कंपनीने 17,500 ट्रॅक्टर्सची निर्यातही केली. महिंद्रा अँड महिंद्रा सीईओ अनिश शाह म्हणाले, “आमच्या बिझनेस मॉडेलने चौथ्या तिमाहीत आणि संपूर्ण आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली. कोविड, वस्तूंच्या वाढत्या किमती, सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि युक्रेनचे संकट यासारख्या आव्हानांना न जुमानता, आम्ही आमच्या स्वतःच्या दमावर चांगली कामगिरी केली आहे.''
कंपनीचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर म्हणाले की, 2021-22 या आर्थिक वर्षात वाहन आणि कृषी उपकरणे विभागातून सर्वाधिक महसूल मिळाला आहे. SUV विभागातील महसुलाच्या बाबतीत चौथ्या तिमाहीत कंपनी आघाडीवर होती. वाहन उत्पादनांची अधिक मागणी यापुढेही कायम राहण्याची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.