एक्स्प्लोर

LIC ची संपत्ती पाकिस्तानसह श्रीलंका आणि नेपाळच्या GDP पेक्षा जास्त, नेमकं भांडवल किती?

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC ही भारतातील (India) सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीची मालमत्ता देखील मोठी आहे. आपल्या शेजारच्या तीन देशांच्या जीडीपी पेक्षा जास्त LIC ची मालमत्ता आहे.

LIC wealth News: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC ही भारतातील (India) सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीची मालमत्ता देखील मोठी आहे. आपल्या शेजारी असणाऱ्या श्रीलंका (Sri Lanka), पाकिस्तान (pakistan) आणि नेपाळ (nepal) या तीन देशांच्या जीडीपी पेक्षा जास्त LIC ची मालमत्ता आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

भारताच्या शेजारी देश पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका यांचा GDP जरी एकत्र केला तरी तो आपल्या देशातील सरकारी कंपनीच्या एकूण मालमत्तेच्या बरोबरीचा नाही.  देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) भारताच्या तीन शेजारील देशांपेक्षा जास्त झाली आहे. कंपनीचे AUM वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत 16.48 टक्क्यांनी वाढून 616 अब्ज डॉलर म्हणजेच 51,21,887 कोटी रुपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात ते सुमारे 43,97,205 कोटी रुपये होते. बाजार भांडवलाच्या बाबतीत ही देशातील 7वी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 6.46 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

एलआयसीची मालमत्ता तीन देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त 

मिळालेल्य़ा माहितीनुसार, एलआयसीची मालमत्ता भारताच्या तीन शेजारी देशांच्या एकूण जीडीपीपेक्षा जास्त आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका या तीन देशांपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानचा जीडीपी सध्या 338 अब्ज डॉलर्स इतका आहे. नेपाळचा जीडीपी सुमारे 44.18 अब्ज डॉलर आहे. तर श्रीलंकेचा जीडीपी सुमारे 74.85 अब्ज डॉलर आहे. अशा स्थितीत, या तीन देशांच्या जीडीपीला जोडूनही तो एलआयसीच्या एकूण मालमत्तेच्या जवळपासही नाही.

कंपनीचा निव्वळ नफा 2.50 टक्क्यांनी वाढला

दरम्यान, एलआयसीने नुकतेच जानेवारी ते मार्च या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 2.50 टक्क्यांनी वाढला आहे. सध्या LIC चा नफा हा 13,762 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 13,421 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीच्या एनपीएमध्येही घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या 2.56 टक्क्यांच्या तुलनेत तो 2.01 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

कंपनीकडून गुंतवणूकदारांना लाभांश जाहीर

कंपनीच्या नफ्यात वाढ होणे ही गुंतवणुकदारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कारण, LIC ने भागधारकांना लाभांश जाहीर केलाय. कंपनीने भागधारकांना प्रति शेअर 4 रुपये लाभांश भेट दिला आहे. कंपनीतील सर्वात मोठा भागधारक सरकार आहे. एलआयसीमध्ये सरकारची 96.50 टक्के हिस्सेदारी आहे. अशा परिस्थितीत सरकारला कंपनीकडून लाभांश म्हणून 3662 कोटी रुपये मिळतील.

महत्वाच्या बातम्या:

सरकारच्या तिजोरीत पैसेच पैसे! आरबीआयनंतर आता एलआयसी देणार 3662 कोटींचा लाभांश!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget