(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIC IPO : सरकार ठाम! या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत येणार LIC चा आयपीओ
LIC IPO: LIC IPO या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
LIC IPO Updates : सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी LIC चा आयपीओ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. LIC च्या मूल्यांकनासाठी अधिक वेळ लागणार असल्याने या आर्थिक वर्षात LIC IPO येण्याची शक्यता कमी असल्याचे वृत्त होते. सरकारन हे वृत्त फेटाळले आहे. Department of Investment and Public Asset Management ( DIPAM) चे सचिव तुहीन कांत पांडे यांनी हे वृत्त फेटाळून लावले.
पांडे यांनी ट्वीट करत म्हटले की, काही माध्यमांनी LIC IPO येण्याबाबत संशय निर्माण करणारे वृत्त दिले होते. हे वृत्त चुकीचे आहे. LIC IPO ची तयारी सुरू असून या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत आयपीओ येईल.
सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील सरकारची हिस्सेदारी पाहणाऱ्या विभागाने एलआयसीचे मूल्यांकन करण्याचे काम एका सल्लागार संस्थेकडे सोपवले आहे. आयपीओ हाताळणाऱ्या मर्चंट बँकरच्या एका अधिकाऱ्याने दावा केला होता की, आयपीओ आणण्यापूर्वी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून तसेच विमा क्षेत्र नियामक IRDAI ची परवानगी घ्यावी लागेल.
सरकारने एलआयसीच्या लिस्टींगसाठी एलआयसी कायद्यात आधीच सुधारणा केली आहे. नवीन तरतुदींनुसार, लिस्टिंगनंतर पहिल्या पाच वर्षांसाठी सरकारची LIC मध्ये किमान 75 टक्के भागिदारी ठेवणार. परंतु त्यानंतर ही मर्यादा 51 टक्क्यांपर्यंत खाली येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Share Market crash : शेअर बाजारात हाहा:कार, सेन्सेक्स 1800 अंकांनी कोसळला
- दोन महिन्यांपासून शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड; किरकोळ गुंतवणूकदारांच्या कमाईला लागले ग्रहण!
- New Labor Code : आठवड्यात तीन दिवस सुट्टी, चार दिवस काम? 'टेक होम सॅलरी' घटणार!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha