एक्स्प्लोर

LIC Investment In Adani : LIC चे 30 हजार कोटी धोक्यात! अदानी समूहातील गुंतवणुकीचे मूल्य किती?

LIC Investment In Adani :  अदानी समूहातील कंपन्यांमध्ये एलआयसीने केलेली गुंतवणूक धोक्यात आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

LIC Investment In Adani :  भारत सरकारच्या मालकीची असलेली आणि देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीची (LIC) अदानी समूहातील गुंतवणूक (LIC Investment In Adani Groups) धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. एलआयसीने अदानी समूहातील (Adani Group) कंपन्यांमध्ये 30,127 कोटींची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीचे मूल्य 24 जानेवारी रोजी 81,268 कोटी रुपये इतके झाले होते. मात्र, मागील महिनाभरापासून अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण होत आहे. त्याचा परिणाम एलआयसीच्या गुंतवणुकीवर झाला आहे. 

अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या संशोधन अहवालानंतर  अदानी समूहातील लिस्टेड कंपन्यांचे शेअर दर 80 टक्क्यांनी घसरल्या आहेत. अदानी समूहात एलआयसीने केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य आता  33,149 कोटी रुपये इतकेच राहिले आहे. याचाच अर्थ एलआयसीच्या गुंतवणुकीवरील नफा जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा झाला आहे. अदानी समूहाच्या शेअर दरात अशीच घसरण कायम राहिल्यास एलआयसीची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. 

एलआयसीने 30 जानेवारी रोजी अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 30,127 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे जाहीर केले होते. 27 जानेवारी रोजी या गुंतवणुकीचे मूल्य 56,142 कोटी रुपये होते. डिसेंबर तिमाहीच्या तिमाही शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, एलआयसीने अदानी समूहाच्या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. यामध्ये एसीसी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अंबुजा सिमेंट्स यांचा समावेश आहे. 30 सप्टेंबर 2022 च्या आकडेवारीनुसार, LIC ची एकूण मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) 41.66 लाख कोटी रुपये होती. एलआयसीने म्हटले होते की अदानी समूहातील त्यांची गुंतवणूक त्यांच्या एकूण एयूएमच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे.

अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये घसरण सुरुच

अदानी समूहाच्या दहापैकी आठ लिस्टटेड कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. यामुळे समूहाचे मार्केट कॅप 20,000 कोटी रुपयांनी कमी झाले. गेल्या एका महिन्यात अदानी समूहाचे मार्केट कॅप 60 टक्क्यांहून अधिक घसरून 7.38 लाख कोटी रुपयांवर आले आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अदानी अनेक उपाय करत आहे. पण आजपर्यंत त्याचा कोणताही परिणाम दिसला नाही. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र, अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget