एक्स्प्लोर

layoff : दोन मिनिटांची ऑनलाईन मिटिंग अन् 200 जणांवर एका झटक्यात बेकारीची कुऱ्हाड

layoff News : या कंपनीने अवघ्या 2 मिनिटांच्या व्हर्च्युअल कॉलद्वारे आपल्या 200 लोकांना कामावरून काढून टाकले आहे.

layoff On Google Meeting :  मागील वर्षापासून सुरू असणारे मंदीचे सावट अजूनही सरण्याची चिन्हं नाहीत. आता अमेरिकन स्टार्टअप फ्रंट डेस्क कंपनीने (Frontdesk) वर्षातील पहिली नोकर कपात केली आहे. या कंपनीने अवघ्या 2 मिनिटांच्या व्हर्च्युअल कॉलद्वारे आपल्या 200 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. 'टेकक्रंच'च्या वृत्तानुसार, कर्मचार्‍यांची Google मीटवर 2 मिनिटांसाठी मिटिंग घेण्यात आली. या दोन मिनिटांच्या मिटिंगमध्ये कर्मचाऱ्यांना नोकर कपातीची माहिती देण्यात आली.  

कंपनीच्या सीईओंनी काय म्हटले?

वृत्तानुसार, स्टार्टअप कंपनी फ्रंटडेस्कचे सीईओ जेसी डीपिंटो यांनी कॉल दरम्यान कंपनीच्या आर्थिक संकटाबद्दल कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यासोबतच कंपनीकडून आता दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी अर्ज देण्यात येणार असल्याचे संकेतही दिले. याचा अर्थ कंपनीला स्वतःला दिवाळखोर घोषित करायचे आहे. यासाठी लवकरच अर्जही दिला जाऊ शकतो. व्हर्च्युअल बैठकीदरम्यान सीईओने सांगितले की स्टार्टअपचे बिझनेस मॉडेल वेगवेगळ्या आघाड्यांवर संघर्ष करत आहे. JetBlue Ventures आणि Veritas Investments सारख्या गुंतवणूकदारांकडून अंदाजे 26 दशलक्ष डॉलरचा निधी उभारूनही, कंपनीला आव्हानांचा सामना करावा लागला.

कंपनी करते काय?

स्टार्टअप फ्रंटडेस्कची स्थापना 2017 मध्ये झाली. या कंपनीला अमेरिकेत 1,000 हून अधिक अपार्टमेंट्स मॅनेजमेंट करण्याचा अनुभव आहे. अलीकडेच या कंपनीने विस्कॉन्सिन येथील प्रतिस्पर्धी जेनसिटी ताब्यात घेतली आहे. अवघ्या सात महिन्यांतच नोकर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. मालमत्तेचे भाडे भरण्यात अडचण येत असल्याने कंपनीला आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत कंपनीला मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला.

झेरॉक्समध्येही टाळेबंदी

3 जानेवारी रोजी झेरॉक्सने 15 टक्के कर्मचारी कमी करण्याचा आपला निर्णय जाहीर केला. एका वृत्तानुसार, कंपनीत सुमारे 20,500 कर्मचारी होते. या नोकर कपातीच्या घोषणेचा अंदाजे 3,000 कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. झेरॉक्स ही अमेरिकन कंपनी डिजिटल प्रिंटिंग आणि दस्तऐवज व्यवस्थापन तंत्रज्ञानामध्ये सक्रिय आहे. 

नव्या वर्षापूर्वीच 'पेटीएम'मध्ये नोकर कपात

नवीन वर्ष 2024 सुरू होण्यापूर्वी  पेटीएमने आपल्या कर्मचाऱ्यांना धक्का दिला. पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्सने (One 97 Communications) 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं असल्याचे वृत्त समोर आले. Paytm नं खर्चात कपात आणि व्यवसाय सुव्यवस्थित करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही मोठी नोकर कपात केली आहे. त्याशिवाय, आवश्यकता भासल्यास आगामी काळात आणखी नोकर कपात केली जाऊ शकते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget