'या' योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक केलीय का? 25 दिवसात 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा तुमचे खाते...
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY)या योजनांमध्ये जर वेळेत पैसे भरले नाहीत तर खाते बंद होण्याची शक्यता असते.
PPF NPS and SSY scheme News : विविध प्रकारच्या सरकारी योजनांमध्ये (Govt Schem) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. अनेक योजना अशा आहेत की, ज्यामध्ये वर्षातून फक्त एकदाच पैसे भरावे लागतात. पुन्हा वर्षभर कोणत्याही प्रकारची रक्कम भरावी लागत नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY)या योजनांमध्ये जर वेळेत पैसे भरले नाहीत तर खाते बंद होण्याची शक्यता असते. हे खाते पुन्हा सुरु करण्यासाठी तुम्हाला ज्यादाचे चार्ज आकारले जाऊ शकतात. त्यामुळं तुम्ही 31 मार्चच्या अगोदर या योजनांमध्ये रक्कम भरा अन्यथा तुम्हाला फटका बसू शकतो.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY)या योजनांमध्ये जर तुम्ही पैशांची गुंतणूक केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. या योजनेचे खाते सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला 31 मार्चच्या आत पैसे भरावे लागणार आहेत. प्रत्येक वर्षी या योजनेत पैसे भरावेच लागतात. हे पैसे भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. सरकारनं आयकराच्या बाबतीत नवीन नियम लागू केले आहेत.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही भारतातील दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. पीपीएफमध्ये दरवर्षी किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतात. पीपीएफवरील व्याजदर सरकार ठरवते. सध्या या योजनेवर वार्षिक 7.1 टक्के व्याजदर आहे. PPF चा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
केंद्र सरकारने 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानांतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत मुलींच्या भवितव्यासाठी गुंतवणूक केली जाते. जेणेकरून पालकांना लग्न, शिक्षण यांसारख्या खर्चाची पूर्तता करण्यात कोणतीही अडचण येऊ नये. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, फक्त 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठीच खाते उघडता येते. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर हे सुकन्या समृद्धी खाते परिपक्व होते. यामध्ये वित्तीय वर्षात किमान 250 रुपयांची गुंतवणूक करता येईल. तुम्ही एका वर्षात कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्ही जर 250 रुपये भरले नाहीत तर, तुमचे खाते बंद होण्याची शक्यता आहे. हे खाते पुन्हा सुरु करण्यासाठी तुम्हाला ज्यादाचे पैसे द्यावे लागतील.
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)
राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System) ही सरकारी योजना आहे. नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये (NPS) गुंतवणूक करुन तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचे चांगले नियोजन करु शकता. यामध्ये तुम्ही रिटायरमेंट फंड आणि पेन्शन या दोन्हींचा पर्याय निवडू शकता. राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही निवृत्तीसाठी चांगला निधी जमा करू शकता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर भरण्यातही सवलत मिळते. राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System) मध्ये तुम्हाला 2,00,000 रुपयांपर्यंत कर सवलत मिळू शकते. या योजनेत वर्षाला कमीत कमी 1000 रुपये जमा करावे लागतात. अन्यथा हे खाते बंद होऊ शकते.
या योजनेत गुंतवणूक करुन कर वाचवू शकता
दरम्यान, तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक करून कर वाचवू शकता. राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला प्राप्तिकर भरताना सवलत मिळवता येईल आयकराच्या कलम 80CCD(1) अंतर्गत 1.5 रुपये लाख आणि कलम 80CCD(2) अंतर्गत 50 हजार रुपयांची कर सूट उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या: