PM-Kisan Samman Nidhi : कागद पे कागद आणि बँकेत चकरा मारूनही खात्यात दोन हजार जमा नाहीत? पंचायतमध्ये जाऊन हे काम करावं लागेल!
PM-Kisan Samman Nidhi : तुमच्या खात्यात पैसे न येण्याची अनेक कारणे असू शकतात. एक कारण म्हणजे तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही. ई-केवायसी नसल्याचीही शक्यता आहे.
PM-Kisan Samman Nidhi : किसान सन्मान निधी योजनेचा15 वा हप्ता 15 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली होती. मात्र, अनेक शेतकरी असे आहेत की, ज्यांचे नाव लाभार्थी यादीत असूनही या योजनेची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला रक्कम मिळेल
तुमच्या खात्यात पैसे न येण्याची अनेक कारणे असू शकतात. एक कारण म्हणजे तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही. ई-केवायसी नसल्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही ही सर्व महत्त्वाची कामे पूर्ण केली असतील तर तुमची तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला लवकरच सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे मिळू शकतात.
कागद पे कागद आणि बँकेत चकरा मारूनही खात्यात दोन हजार जमा नाहीत?
ज्या पात्र शेतकऱ्यांचे किसान सन्मान निधी जमा झालेला नाही त्यांनी बँक किंवा इतर कोणतीही तक्रार असल्यास ग्रामपंचायत कार्यालयात आपली तक्रार रजिस्टर मध्ये नोंद करावी.
खालील कागदपत्रे सोबत सादर करावीत
- 8 अ उतारा
- 7/12 उतारा
- बँक पासबुक
- आधार कार्ड
- रेशन कार्ड पीएम किसान योजनेचा ऑनलाईन रिपोर्ट स्टेटस
दरम्यान, नवीन पीएम किसान नोंदणीसाठी महा-ई-सेवा केंद्रामधून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. त्याठिकाणी अर्ज भरताना काळजी घेतल्यास पुढील हप्ताआपला जमा होऊ शकतो.
या चुकांमुळे पैसे अडकू शकतात
भरलेल्या अर्जातील कोणतीही छोटीशी चूक तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्यांपासून वंचित ठेवू शकते. जर तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम आली नसेल तर आधी तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. जर तुम्ही दिलेली माहिती चुकीची असेल, जसं जेंडर निवडण्यात चूक, नावात चूक, आधार क्रमांक चुकीचा किंवा पत्ता इत्यादी, तरीही तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता. या माहितीत काही चूक असल्यास ती त्वरित दुरुस्त करा. असे केल्याने पुढील हप्त्यासह तुमची रक्कम तुमच्या खात्यात पाठवली जाण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी येथे संपर्क साधावा
सर्वकाही बरोबर असतानाही, PM किसान योजनेची रक्कम तुमच्या खात्यावर पोहोचली नसेल, तर सर्वप्रथम तुम्ही pmkisan-ict@gov.in या अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092. इथेही तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
6,000 रुपयांची वार्षिक मदत
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दर 4 महिन्यांच्या अंतराने पाठवली जाते.
इतर महत्वाच्या बातम्या