LIC IPO:तुमच्याजवळ LIC ची पॉलिसी असेल तर IPOमध्ये किती होईल फायदा? पैसे गुंतवावे का?
LIC IPO updates : एलआयसी आयपीओसाठी इच्छुक असलेल्या पॉलिसीधारकांसाठी कंपनीने महत्त्वाची सूचना केली आहे.
LIC IPO updates : शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या बहुतांशी गुंतवणुकदारांना LIC च्या IPO ची प्रतिक्षा आहे. खासकरून ज्यांच्याकडे एलआयसीची पॉलिसी आहे, अशा पॉलिसीधारकांनाही या आयपीओची प्रतिक्षा आहे. LIC IPO मध्ये पॉलिसीधारकांसाठी 10 टक्के शेअर राखीव असणार आहेत. एलआयसीने आपल्या पॉलिसीधारकांसाठी आयपीओच्या अनुषंगाने महत्त्वाची सूचना केली आहे.
पॅन कार्ड अपडेट करा
एलसीआयने पॉलिसीधारकांसाठी पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. याचा फायदा त्यांना आयपीओच्या वेळी मिळणार आहे. LIC पॉलिसीधारकांना कर्मचाऱ्यांच्या समकक्ष ठेवण्यासाठी कायद्यात सुधारणाही करण्यात आली. आता त्यामुळे 10 टक्के सवलतीवर फ्लोटचा 10 टक्के भाग मिळू शकतो.
कधी येणार LIC चा आयपीओ?
LIC च्या IPO ची तारीख अद्याप ठरलेली नाही, परंतु मार्च 2022 पर्यंत हा आयपीओ बाजारात येईल आणि आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत शेअर बाजारात सूचीबद्ध होईल अशी दाट शक्यता आहे. सुरू असलेल्या आर्थिक वर्ष म्हणजे मार्च 2022 पर्यंत LIC शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येत आहे. एलआयसीच्या निर्गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. IPO आणि शेअर बाजारात कंपनी सूचीबद्ध करण्यासाठी LIC कायदा 1956 मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. मात्र, आयपीओद्वारे किती शेअर्स विकले जातील आणि ते कोणत्या प्राइस बँडमध्ये असतील हे अद्याप निश्चित झालेले नाही.
एलआयसी आयपीओ सरकारसाठी महत्त्वाचा का आहे?
एलआयसीची निर्गुंतवणूक सरकारसाठी खूप महत्त्वाची आहे. या आर्थिक वर्षात 1.75 लाख कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर ते फक्त LIC कडूनच करता येईल असे म्हटले जाते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती की 2021-22 मध्ये सरकार निर्गुंतवणुकीद्वारे 1.75 लाख कोटी रुपये उभे करू इच्छित आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खाजगीकरण करण्याचीही योजना आहे, परंतु त्यावर अद्याप काही ठरले नाही.
पैसे का गुंतवावे?
LIC ही देशातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. एलआयसी कंपनीचा आकार आणि सर्वसामान्यांपर्यंत त्याची पोहोच लक्षात घेता, त्याच्या व्यवसायातील वाढ अपेक्षित आहे. महासाथीचे आजार पाहता भविष्यातही कंपनीची वाढ अपेक्षित आहे. LIC चा विमा बाजारातील हिस्सा जवळपास 66 टक्के आहे. LIC ची एकूण मालमत्ता 31 मार्च 2020 पर्यंत, 37.75 लाख कोटी रुपये होती. कंपनीकडे 22.78 लाख एजंट आणि 2.9 लाख कर्मचारी यांचे विशाल जाळे आहे.
शेअर प्राइसबॅण्ड किती असू शकतो?
LIC IPO मध्ये शेअर प्राइसबॅण्ड किती असू शकतो याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. गुंतवणुकदारांच्यादृष्टीने महत्त्वाची माहिती ठरू शकते.
याआधीच्या सूचीबद्ध झालेल्या सरकारी विमा कंपन्यांचे काय झाले?
याआधी शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या सरकारी विमा कंपन्यांच्या आयपीओबाबत चांगला अनुभव नाही. सन 2017 मध्ये, न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीचा प्रति शेअर 770-800 रुपयांना देण्यात आला होता. बीएसईवर 748.90 रुपयांना सूचीबद्ध झाला होता. आज न्यू इंडिया इन्शुरन्सच्या शेअरची किंमत सूचीबद्ध होताना असलेल्या किमतीपेक्षाही कमी आहे. सध्या या शेअरचा दर जवळपास 161 रुपये आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NSE वर 857.50 रुपयांवर सूचीबद्ध झाली होती. परंतु आज त्याची प्रति शेअर किंमत 149.50 रुपयांवर आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने दिली जात आहे. बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ABPLive.com च्या माध्यमातून येथे कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जात नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या:
नोकरी सोडल्यानंतरही मिळणार PF आणि पेन्शनचा लाभ, EPFO करत आहे 'हा' बदल
SBI vs Post office: तुम्ही RD करत असाल जाणून घ्या कुठे होईल अधिक फायदा?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha