गृहलक्ष्मी योजनेचे 2 हजार आले, आख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण, कर्नाटकातील लाडक्या बहिणीचा नाद खुळा!
सध्या कर्नाटकमधील गृहलक्ष्मी योजनेचीही संपूर्ण देशभरात चर्चा होत आहे. या योजनेचे पैसे खात्यावर येताच एका महिलेने संपूर्ण गावाला जेवण दिले आहे.
देशभरात महाराष्ट्राच्या लाडकी बहीण (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) योजनेची चर्चा चालू असताना आता कर्नाटक राज्यातील 'गृहलक्ष्मी योजने'चीही तेवढीच चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा 2000 रुपयांची मदत केली जात आहे. या योजनेचे पैसे बँक खात्यावर येताच तेथील एका महिलेने थेट संपूर्ण गावाला पुरवणपोळीचं जेवण दिलं आहे. महिलेच्या या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
महिलेने दिलं पुरणपोळीचं गावजेवण
कर्नाटक राज्यात सध्या गृहलक्ष्मी योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमाह 2000 रुपयांची मदत केली जात आहे. रायबाग तालुक्यातील सुतट्टी गावातील अक्काताई लंगोटी यांनादेखील आली. या योजनेचे 2000 रुपये मिळताच त्यांनी संपूर्ण गावालाच जेवण दिलं आहे. विशेष म्हणजे हे जेवण साधंसुधं नसून या महिलेने संपूर्ण गावाला जेवणात पुरणपोळी दिली आहे.
मंदिरात पूजा, महिलांना दिल्या भेटवस्तू
ही महिला एवढ्यावरच थांबली नाही. या गृहलक्ष्मीने सुवासिनींची ओटी भरून काही महिलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या आहेत. या महिलेने गावातील मंदिरात पूजाअर्चा देखील केली आहे. त्यामुळेच सध्या या महिलेची आणि गृहलक्ष्मी योजनेची सगळीकडे चर्चा होत आहे.
सिद्धरामय्या यांच्यासाठी केली प्रार्थना
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही गृहलक्ष्मी योजना चालू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गृहिणींना प्रतिमहिना दोन हजार रुपये दिले जात आहेत. ही योजना चालू करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फार चांगला निर्णय घेतला आहे. राजकारणात त्यांना आणखी वरचे पद मिळावे, अशी प्रार्थना करत या महिलेने अख्ख्या गावाला जेवण दिलं आहे. या महिलेने ग्रामदैवताची पूजा करून देवाचरणी सिद्धरामय्या यांच्या राजकीय प्रगतीची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेचीही चर्चा
दरम्यान, सध्या महाराष्ट्रातही अशाच प्रकारची लडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा चालू आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत कोट्यवधी महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित असे 3000 रुपये देण्यात आले आहेत. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप चालूच आहे. 31 ऑगस्टनंतर अर्ज दाखल केलेल्या महिलांना आता राज्य सरकारतर्फे सप्टेंबर महिन्यात 4500 रुपये दिले जाणार आहेत.
हेही वाचा :