टॉवर सेमीकंडक्टरच्या चिप फॅब ॲप्लिकेशनला मान्यता देऊ नका, ISMC ॲनालॉग फॅबची सरकारकडे विनंती
ISMC ने भारत सरकारला टॉवर सेमीकंडक्टरच्या नवीन चिप फॅब कन्स्ट्रक्शन अॅप्लिकेशनला मान्यता देऊ नये, अशी विनंती केली आहे.
ISMC semiconductor : भारतीय सेमीकंडक्टर कंपनी ISMC Analog Fab ने सरकारला नवे आवाहन केले आहे. ISMC ने भारत सरकारला टॉवर सेमीकंडक्टरच्या नवीन चिप फॅब कन्स्ट्रक्शन अॅप्लिकेशनला मान्यता देऊ नये, अशी विनंती केली आहे. 8 मार्च रोजी, ISMC च्या कायदेशीर संघाने भारतीय सेमीकंडक्टर मिशन (ISM) शी संपर्क साधला होता. ISMC चा दावा आहे की त्यांच्या कंपनीने कर्नाटकात जमीन संपादन करण्यासाठी अर्ज केला होता. या प्रकल्पात महत्त्वपूर्ण वेळ, पैसा आणि संसाधने गुंतवली होती. मात्र, टॉवर सेमीकंडक्टरने त्यांच्याशी केलेल्या कराराचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
ISMC च्या वकिलांनी देखील टॉवर सेमीकंडक्टरवर कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केलीय. दरम्यान, याप्रकरणी सरकार काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. भारत सरकार आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत देशांतर्गत चिप उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. अशा परिस्थितीत सरकार ISMC आणि टॉवर सेमीकंडक्टरमधील हा वाद कसा सोडवते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ISMC ॲनालॉग फॅब आणि टॉवर सेमीकंडक्टरमध्ये करार काय?
डिसेंबर 2020 मध्ये, ISMC ॲनालॉग फॅब आणि टॉवर सेमीकंडक्टरने भारतात 300-मिमी एनालॉग/मिक्स फॅब प्रकल्प उभारण्यासाठी करार केला होता. या करारानुसार दोन्ही कंपन्या संयुक्तपणे फॅब तयार करतील. फॅबची स्थापना कर्नाटकात होणार आहे. तसेच या प्रकल्पाची अंदाजे किंमत 75,000 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते.
काय आहेत कराराची उद्दिष्टे
भारतात देशांतर्गत चिप उत्पादनाला चालना देण्यासाठी
सेमीकंडक्टर्समध्ये भारताला स्वावलंबी बनवणे
रोजगाराच्या संधी निर्माण करणे
कराराचे फायदे काय?
या करारामुळे भारताला सेमीकंडक्टर व्हॅल्यू चेनमध्ये महत्त्वाचा खेळाडू बनण्यास मदत होईल.
यामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उद्योगाला चालना मिळेल.
हे भारतातील संशोधन आणि विकासाला चालना देईल.
कराराबद्दल चिंता
या कराराबद्दल काही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की हा करार भारतासाठी फायदेशीर ठरणार नाही, कारण यामुळे टॉवर सेमीकंडक्टरला भारतीय बाजारपेठेत मक्तेदारी मिळेल. हा करार पर्यावरणासाठी घातक ठरेल, असे काही लोकांचे मत आहे.
ISMCचा नेमका आरोप काय?
डिसेंबर 2020 मध्ये, ISMC ॲनालॉग फॅब आणि टॉवर सेमीकंडक्टरने भारतात 300-मिमी एनालॉग/मिक्स फॅब प्रकल्प उभारण्यासाठी करार केला होता. या करारानुसार, ISMC आणि टॉवर सेमीकंडक्टर संयुक्तपणे फॅब तयार करतील. ISMC ने कर्नाटकात जमिनीसाठी अर्ज केला आणि प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण वेळ, पैसा आणि संसाधने गुंतवली. मार्च 2023 मध्ये, टॉवर सेमीकंडक्टरने ISMC ला माहिती न देता स्टँड-अलोन फॅब सेट करण्यासाठी भारत सरकारकडे अर्ज केला. टॉवर सेमीकंडक्टरने त्यांच्यासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा ISMCचा आरोप आहे.
ISMC ने टॉवर सेमीकंडक्टरचा नवीन अर्ज नाकारण्याची सरकारला विनंती केली आहे.
शासनाची भूमिका काय?
भारत सरकार आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत देशांतर्गत चिप उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे.
हा वाद सरकार कसा सोडवणार आणि भविष्यात फॅब उभारण्याचे अधिकार कोणत्या कंपनीला मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या वादाचा भारताच्या सेमीकंडक्टर उत्पादन योजनांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
परदेशी गुंतवणूकदारांसाठीही हा चिंतेचा विषय ठरू शकतो.
ISMC ॲनालॉग फॅब
ISMC ॲनालॉग फॅब ही मुंबईस्थित कंपनी आहे. जी भारतात अत्याधुनिक चिप उत्पादन प्रकल्प (फॅब) स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. डिसेंबर 2020 मध्ये, ISMC ने, इस्रायली कंपनी टॉवर सेमीकंडक्टरसह, भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर उत्पादन योजनेअंतर्गत सबसिडी प्राप्त करण्यासाठी अर्ज केला होता. भारतातील देशांतर्गत चिप उत्पादनाला चालना देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या: