एक्स्प्लोर

Tata Technologies IPO : लाँच होण्याआधीच टाटाच्या आयपीओचा धुरळा; ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम दर सुस्साट

Tata Technologies IPO : टाटा समूहाचा हा IPO 22 नोव्हेंबर रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे आणि 24 नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येईल

Tata Tech IPO :  शेअर बाजारासाठी हा आठवडा अतिशय खास असणार आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार ज्याची प्रतिक्षा करत होते, ती प्रतिक्षा या आठवड्यात संपणार आहे. शेअर बाजारात बहुप्रतिक्षित टाटा टेक्नॉलोजीचा आयपीओ (Tata Technologies IPO) 22 नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे. मात्र, त्याआधीच टाटा टेक्नोलॉजीचा शेअर दर वधारू लागला आहे. 

टाटा समूहातील अनेक शेअर्स मल्टीबॅगर

टाटा समूहातील कंपन्यांचे अनेक शेअर्स बाजारात मल्टीबॅगर्स ठरले आहेत. TCS असो वा टायटन किंवा ट्रेंट, टाटा समूहाच्या समभागांनी अनेक गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. भारतीय बाजारपेठेतील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या यशात टाटा समूहाच्या शेअर्सचाही मोठा वाटा होता.

IPO बाबत सकारात्मक वातावरण

आता जवळपास दोन दशकांनंतर टाटा समूहाकडून नवीन IPO येत आहे. याआधी टाटा ग्रुपचा शेवटचा IPO 2002 मध्ये आला होता, जेव्हा टाटा समूहातील IT कंपनी TCS बाजारात आली होती. आज TCS ही शेअर बाजारातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. मार्केट कॅप म्हणजेच बाजार भांडवलाबाबत फक्त रिलायन्स इंडस्ट्रीज त्याच्या पुढे आहे. साहजिकच टाटाच्या नव्या आयपीओबाबत बाजारात सध्या सकारात्मक वातावरण दिसत आहे. विशेषतः किरकोळ गुंतवणूकदार टाटाच्या नवीन IPO ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

इतके पैसे गुंतवायचे आहेत

टाटा समूहाचा हा IPO 22 नोव्हेंबर रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होणार असून 24 नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येईल. या IPO साठी 475 ते 500 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. आयपीओच्या एका लॉटमध्ये टाटा टेकचे 30 शेअर्स आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदाराला या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 15,000 रुपयांची गरज भासणार आहे.

5 डिसेंबरपासून ट्रेडिंग सुरू होणार

या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरला बोली बंद केल्यानंतर, 30 नोव्हेंबरला टाटा टेक्नॉलोजीचे शेअर्सचे वाटप केले जातील. ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये युनिट्स मिळत नाहीत त्यांच्यासाठी 1 डिसेंबरपासून त्यांचे पैसे परत देण्यास सुरू होणार आहे. तर, 4 डिसेंबर रोजी यशस्वी बोली लावणाऱ्यांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. टाटा टेकच्या शेअर्सची शेअर बाजारात लिस्ट 5 डिसेंबरला होणार आहे.

70 टक्के प्रीमियमवर किंमत

टाटा टेकचा आयपीओ उघडायला अजून दोन दिवस बाकी आहेत. पण ग्रे मार्केटमध्ये याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. रविवार 19 नोव्हेंबर रोजी टाटा टेकचा जीएमपी 240-260 रुपये झाला आहे. म्हणजेच ग्रे मार्केटमध्ये टाटा टेकचे शेअर्स आयपीओपूर्वी 70 टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहेत. बाजारातील परिस्थिती अशीच राहिली तर या IPO चे गुंतवणूकदार काही दिवसात 70 टक्के कमावणार आहेत.

(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक तज्ज्ञ, आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. )

महत्त्वाच्या बातम्या

Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget