search
×

LIC IPO Update : LIC IPO ला गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद! अर्ध्या तासात लागल्या 'इतक्या' बोली 

LIC IPO : एका तासाच्या आत, 12 टक्के गुंतवणूकदारांनी LIC IPO सबस्क्राइब केले आहेत.

FOLLOW US: 
Share:

LIC IPO : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC IPO) चा IPO 4 मे पासून लाँच झाला आहे. लाँच झाल्यापासून गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. IPO सकाळी 10 वाजता उघडला आणि उघडल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्याचे 4 टक्के सदस्य झाले. या IPO मध्ये एकूण 16,20,78,067 शेअर्सची बोली लावण्यात येणार आहे. पहिल्या काही मिनिटांत जवळपास 70,61,970 शेअर्सची बोली लागली आहे.

LIC IPO चे पहिल्या तासात 12% सबस्क्राइब 
एका तासाच्या आत, 12 टक्के गुंतवणूकदारांनी LIC IPO  सबस्क्राइब केले आहेत. या IPO च्या माध्यमातून सरकारला अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करायचे आहे. LIC च्या IPO बाबत बाजारात आधीच खूप उत्सुकता होती, ज्याचा परिणाम आज IPO वर स्पष्टपणे दिसून येतो. IPO लाँच झाल्यापासून अवघ्या 1 तासात सुमारे 12 टक्क्यांनी सदस्यता घेतली आहे. गुंतवणूकदार 4 मे 2022 ते 9 मे 2022 या कालावधीत LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतील.

2,21,37,492 शेअर्स विमाधारकासाठी राखीव
LIC ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 15,81,249 शेअर्स राखीव ठेवले आहेत. त्याच वेळी, 2,21,37,492 शेअर्स त्याच्या विमाधारकासाठी राखीव आहेत. QIB साठी 9.88 कोटी शेअर्स आणि 2.96 कोटी गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना प्रति शेअर 45 रुपये सूट मिळत आहे. कंपनीने या IPO मध्ये विशेष सूट देत विमाधारकाला प्रति शेअर 60 रुपये सूट दिली आहे.

एलआयसीचा पॉलिसीधारकांना आयपीओबद्दल संदेश
4 मे रोजी आयपी लॉन्च करण्यापूर्वी, एलआयसीने त्यांच्या विमाधारकाला संदेश पाठवून या आयपीओबद्दल माहिती दिली आहे. एलआयसीने सांगितले की त्यांनी 902-949 रुपयांच्या दरम्यान शेअरची किंमत निश्चित केली आहे. हा IPO 4 मे रोजी उघडेल आणि शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी बंद होईल.

Published at : 04 May 2022 12:43 PM (IST) Tags: Marathi News india news Business news LIC IPO lic ipo opening

आणखी महत्वाच्या बातम्या

पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!

पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!

Traditional And Unified KYC : पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

Traditional And Unified KYC : पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Tata IPO : गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

Tata IPO :  गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

टॉप न्यूज़

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू

माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात