एक्स्प्लोर

IPO : दीड वर्षानंतर येणार आहे सरकारी कंपनीचा IPO; किरकोळ किमतीत शेअर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ireda IPO News : आता दुसरीकडे जवळपास दीड वर्षानंतर आणखी एक सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.

Share Market IPO :  शेअर बाजारात खासगी कंपन्या लिस्ट होत असताना आता दुसरीकडे जवळपास दीड वर्षानंतर आणखी एक सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. सरकारी मिनीरत्न कंपनी इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा (IREDA) आयपीओ येणार आहे.  
 
आयपीओमध्ये प्रति शेअर किती दर?

IREDA ने त्यांच्या 2,150 कोटी मूल्याच्या IPO साठी प्रति शेअर 30-32 रुपये किंमत बँड सेट केला आहे. कंपनीचा IPO हा 21 नोव्हेंबर रोजी उघडणार असून 23 नोव्हेंबरला बंद होईल. अँकर गुंतवणूकदार 20 नोव्हेंबर रोजी बोली लावू शकतील. गेल्या वर्षी मे महिन्यात एलआयसीच्या आयपीओनंतर सरकारी कंपनीचा हा पहिलाच इश्यू आहे. यामध्ये 40.3 कोटी नवीन इक्विटी इश्यू जारी केले जातील. तर 26.8 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जातील. IREDA ही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली मिनीरत्न कंपनी आहे.

या IPO मध्ये 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आहेत. तसेच कर्मचाऱ्यांसाठी 1,875,420 शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. IPO मधून जमा होणारा निधी भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे. 

आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स, बीओबी कॅपिटल मार्केट्स आणि एसबीआय कॅपिटल हे या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि लिंक इनटाइम इंडियाची रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कंपनीची कामगिरी कशी आहे?

IREDA ही कंपनी गेल्या 36 वर्षांपासून कार्यरत आहे आणि देशातील सर्वात मोठी समर्पित हरित वित्तपुरवठा करणारी NBFC आहे. सप्टेंबर 2023 मध्ये संपलेल्या सहामाहीत कंपनीचा महसूल 47 टक्क्यांनी वाढून 2,320 कोटी रुपये झाला, तर नफा 41 टक्क्यांनी वाढून 579 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा स्वतंत्र महसूल 22 टक्क्यांनी वाढून 3,482 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 36 टक्क्यांच्या वाढीसह 865 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट केले जातील.

पुढच्या आठवड्यात उघडणार Tata Technologies IPO

तब्बल 20 वर्षांनंतर टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ (Tata Group IPO) येणार आहे. Tata Technologies चा IPO 22 नोव्हेंबर 2024 रोजी उघडत आहे. तर गुंतवणूकदार 24 नोव्हेंबर 2024 पर्यंत सब्सक्राइब करू शकता. बाजारातील गुंतवणूकदार गेल्या अनेक दिवसांपासून टाटा समूहाच्या IPO ची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 

Tata Technologies चा हा IPO (Tata Technologies IPO Details) पूर्णपणे ऑफर फॉर सेलद्वारे (Offer For Sale) येत आहे. म्हणजेच, टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड-1 आणि अल्फा टीसी होल्डिंग या इश्यूद्वारे त्यांचे स्टेक विकणार आहेत. या IPO द्वारे एकूण 60,850,278 इक्विटी शेअर्स विकले जाणार आहेत. यापैकी 46,275,000 इक्विटी शेअर्स टाटा टेक्नॉलॉजीचे, 9,716,853 इक्विटी शेअर्स अल्फा टीसी होल्डिंग आणि 4,858,425 इक्विटी शेअर्स टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 1 द्वारे विकले जाणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची आकडेवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची आकडेवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची आकडेवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची आकडेवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Embed widget