![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IPO News: शेअर बाजारात 'या' दोन कंपन्यांचे आयपीओ दाखल; जाणून घ्या सर्व माहिती
IPO News Updates : शेअर बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे दोन कंपन्यांनी आपले आयपीओ दाखल केले आहेत.
![IPO News: शेअर बाजारात 'या' दोन कंपन्यांचे आयपीओ दाखल; जाणून घ्या सर्व माहिती IPO news venus pipes tubes ipo delhivery ipo subscription ipo update open from 11 may to 13 may 2022 know details IPO News: शेअर बाजारात 'या' दोन कंपन्यांचे आयपीओ दाखल; जाणून घ्या सर्व माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/11/478b34cb24b8bd3ad05eb9071753776c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPO News Updates : शेअर बाजारात आज दोन कंपन्यांचे आयपीओ खुले झाले आहेत. गुंतवणुकीसाठी या दोन कंपन्यांचा चांगला पर्याय असून शकतो. आज, 11 मे रोजी शेअर बाजारात लॉजिस्टीक कंपनी डेल्हीवरी (Delhivery IPO) आणि स्टेनलेस स्टील पाइप आणि ट्युब तयार करणारी व्हीनस पाईप्स आणि ट्युब (Venus Pipes and Tubes IPO) यांचे आयपीओ दाखल झाले आहेत.
>> डेल्हीवरी आयपीओ (Delhivery IPO)
किमान गुंतवणूक : 13890 रुपये
किती शेअर्स मिळतील : 30 शेअर्स
आयपीओ कधी उघडला: 11 मे 2022
आयपीओसाठी शेवटचा दिवस: 13 मे 2022
इश्यू साइज : 5235 कोटी रुपये
प्राइस बॅण्ड : 462-487 रुपये
कंपनी करते काय?
डेल्हीवरी ही लॉजिस्टीक कंपनी आहे. ही कंपनी भारतात जवळपास 88 पिनकोडवर डिलेव्हरीची सुविधा देते. ही कंपनी गुरगाव येथील आहे. ICICI Pre फ्लेक्सीकॅप फंड, HDFC लार्ज आणि मिडकॅप फंड, एसबीआय आणि आयआयएफएल सह अनेक गुंतवणुकदार अँकर गुंतवणुकदार आहेत.
>> व्हीनस पाईप्स आणि ट्युब (Venus Pipes and Tubes IPO)
किमान गुंतवणूक : 14260 रुपये
किती शेअर्स मिळतील : 46 शेअर्स
आयपीओ कधी उघडला: 11 मे 2022
आयपीओसाठी शेवटचा दिवस: 13 मे 2022
इश्यू साइज : 165.35 कोटी रुपये
प्राइस बॅण्ड : 310-326 रुपये
कंपनी करते काय?
व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स स्टेनलेस स्टील पाईप्स आणि ट्यूब्सचे उत्पादन आणि निर्यात करते. कंपनी रासायनिक, अभियांत्रिकी, खत, फार्मा, उर्जा, अन्न प्रक्रिया, कागद आणि तेल आणि वायू क्षेत्रांना व्हीनस ब्रँड नावाखाली आपली उत्पादने पुरवते. भारताव्यतिरिक्त, कंपनी ब्राझील, यूके आणि इस्रायलसह 18 देशांमध्ये आपली उत्पादने कंपनीद्वारे विकली जातात. 2018-19 या आर्थिक वर्षात 3.75 कोटी रुपयांचा निव्वळ नफा (करानंतरचा नफा) होता. तो आर्थिक वर्ष 2019-20 आणि आर्थिक वर्षात 4.13 कोटी रुपयांपर्यंत वाढला. 2020-21. ते झपाट्याने वाढून 23.63 कोटी रुपये झाले. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या नऊ महिन्यांत एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये कंपनीला 23.59 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)