(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बँक-बझार कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत; पुढच्या वर्षी आयपीओ लिस्टिंगचा अंदाज
Bank Bazaar Plans IPO: ऑनलाइन वित्तीय सेवा देणारी फिनटेक कंपनी बँक-बाझार आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.
Bank Bazaar Plans IPO: ऑनलाइन वित्तीय सेवा देणारी फिनटेक कंपनी बँक-बाझार आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. 2023 पर्यंत बाजारात आपला आयपीओ लिस्ट करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीने मार्च 2022 मध्ये पहिल्यांदाच नफा नोंदवल्याची माहिती दिली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीच्या महसुलातही वाढ झाली आहे.
दोन वर्षांत 10 लाख को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड
बँकबाझारने नवीन व्यावसायिक वर्षात विविध विभागांमध्ये एकूण 1500 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. या भरती मोहिमेचा उद्देश कंपनीच्या उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करून को-ब्रँडेड क्रेडिट उत्पादने ज्यामध्ये क्रेडिट कार्ड आणि विविध बँका आणि NBFCs कडील वैयक्तिक कर्जे समाविष्ट करणं असेल. पुढील दोन वर्षात त्यांची दहा लाख को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड बाजारात असतील अशी कंपनीला खात्री आहे. को-ब्रँडेड कार्ड्सच्या बाबतीत येस बँक ही प्रमुख भागीदार आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात या हेतूंची माहिती ददिली आहे.
नकारात्मक EBITDA मार्जिनमध्ये जबरदस्त सुधारणा
बँक-बाझारने 2021-22 मध्ये त्याचा नकारात्मक EBITDA (Earnings Before Interest, Tax, Depreciation and Amortisation) (व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई) मार्जिन जवळपास निम्म्यापर्यंत कमी करण्यात यश मिळवले आहे. 2020-21 मध्ये हे नकारात्मक मार्जिन 51.5 टक्के होते, जे 2021-22 मध्ये जवळपास 25 टक्क्यांवर आले. Sequoia India आणि Amazon द्वारे समर्थित फिनटेक कंपनीने मार्च 2022 रोजी संपलेल्या व्यावसायिक वर्षात 100% CAGR सह वार्षिक 156 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करण्याची घोषणा केली आहे.
बँकबाझारचे लक्ष नेहमीच तीन गोष्टींवर केंद्रित असते: 1. आधुनिक तंत्रज्ञान 2. ग्राहक प्राधान्य आणि 3. चांगला नफा असं कंपनीचे सीईओ आदिल शेट्टी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील काही वेगाने वाढणाऱ्या फिनटेक कंपन्यांपैकी एक आहे असं मत शेट्टींचं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha