एक्स्प्लोर

कमी गुंतवणुकीत अधिक नफा, 'या' आहेत चांगला परतावा मिळवून देणाऱ्या योजना

Investment Plan: चांगला परतावा मिळणाऱ्या अनेक योजना आहेत. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवू शकता. लहान मुलांसाठी देखील विविध बतच योजना आहेत.

Investment Plan: भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणं गरजेचं आहे. गुंतवणूक करताना आपल्याला किती परतावा मिळतो हे पाहणं गरजेचं आहे. चांगला परतावा मिळणाऱ्या अनेक योजना आहेत. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवू शकता. लहान मुलांसाठी देखील विविध बतच योजना आहेत. थोडी थोडी रक्कम बचत करुन तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. जाणून घेऊयात त्या योजनांबद्दल सविस्तर माहिती. 

अनेक योजना आहेत ज्यात फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करता येते. या योजनांमध्ये दरमहा 500 रुपयेही जमा केले, तर वर्षभरात 6000 रुपये जमा होतील. तुम्हाला ठेवीवर व्याज मिळेल आणि काही वेळातच चांगली रक्कम होईल. ज्याद्वारे तुम्ही मुलांच्या कोणत्याही गरजा सहज पूर्ण करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मासिक 500 रुपयांच्या ठेवीसह लाखो रुपये कमवू शकता. 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही देखील एक सरकारी योजना आहे. या योजनेत दरवर्षी किमान 500 रुपये जमा करणं आवश्यक आहे. परंतू, तुम्ही मुलांच्या नावावर दरमहा 500 रुपये जमा केल्यास, तुम्ही चांगली रक्कम जोडू शकता. या योजनेत तुम्हाला 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. ही योजना 15 वर्षांत परिपक्व होते. यामध्ये तुम्ही दरमहा 500 रुपये जमा केल्यास तुम्हाला वार्षिक 6000 रुपये आणि 15 वर्षांत 90,000 रुपये जमा होतील. पीपीएफ कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला 15 वर्षात 72728 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 162728 रुपये मिळतील. जर तुम्ही ही योजना आणखी 5 वर्षे चालू ठेवली तर तुम्हाला 20 वर्षांत 2,66,332 रुपये जमा होतील.

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

जर तुम्ही मुलीचे वडील असाल तर तुम्ही तिच्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. या योजनेत तुम्ही दरवर्षी किमान 250 आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. सध्या या योजनेत 8.20 टक्के व्याज आहे. 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. ही योजना 21 वर्षात परिपक्व होते. या योजनेत तुम्ही दरमहा 500 रुपये गुंतवल्यास, 15 वर्षांत तुमचा एकूण खर्च 90 हजार रुपये होईल. तुम्ही 15 ते 21 वर्षांच्या दरम्यान कोणतीही गुंतवणूक करणार नाही, परंतू, तुमच्या रकमेवर 8.2 टक्के दराने व्याज जोडले जाईल. या प्रकरणात, तुम्हाला व्याज म्हणून 1,87,103 रुपये मिळतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला 2,77,103 रुपये मिळतील.

SIP

एसआयपीद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळतो. सरासरी 12 टक्के परतावा मिळतो. अशा परिस्थितीत, दीर्घकाळापर्यंत, तुम्ही या योजनेद्वारे मुलांसाठी चांगली रक्कम जोडू शकता आणि मुलांच्या शिक्षणासाठी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी वापरू शकता. चांगली गोष्ट अशी आहे की, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार SIP मध्ये गुंतवलेली रक्कम कधीही वाढवू शकता. यामुळे तुमचा नफा आणखी वाढतो. तुम्ही त्यात दरमहा 500 रुपये गुंतवल्यास 15 वर्षांनंतर 12 टक्के व्याजदराने तुम्ही 252288  रुपये मॅच्युरिटी रक्कम म्हणून घेऊ शकता. दुसरीकडे, तुम्ही आणखी 5 वर्षे म्हणजे 20 वर्षे गुंतवणूक करत राहिल्यास, 12 टक्के दराने तुम्ही 4,99,574 रुपये म्हणजे सुमारे 5 लाख रुपये जमा करू शकता.

महत्वाच्या बातम्या:

बँकेला कर्ज द्या, व्याजातून मोठी कमाई करा; जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

महत्त्वाच्या बातम्या

घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
गॅसचा पुरवठा थांबणार नाही! एलपीजीबाबत सरकारचा नवीन प्लॅन, दररोज 63 हजार 810 टन गॅस उत्पादनाचं लक्ष्य 
गॅसचा पुरवठा थांबणार नाही! एलपीजीबाबत सरकारचा नवीन प्लॅन, दररोज 63 हजार 810 टन गॅस उत्पादनाचं लक्ष्य 
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Embed widget