एक्स्प्लोर

प्रत्येक महिन्याला फक्त 591 रुपये जमा करा, काही वर्षातच लखपती व्हा, जाणून घ्या 'या' योजनेबद्दल सविस्तर माहिती

नवीन वर्षात बँकांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन योजना लाँच केल्या आहेत. यामध्येच देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत.

Investment : नवीन वर्षात बँकांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन योजना लाँच केल्या आहेत. यामध्येच देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. हर घर लखपती आरडी योजना आणि एसबीआय संरक्षक एफडी योजना. दोन्ही योजनांद्वारे गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळू शकतो. हर घर लखपती योजना ही एक आवर्ती ठेव योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार 1 लाख रुपये घेऊ शकतो. तर SBI संरक्षक ही मुदत ठेव योजना आहे. ही योजना 80 वर्षांच्या वृद्ध आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. 

ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश बँकेचा उद्देश म्हणजे आपले ग्राहक टिकवून ठेवणे आहे.  स्टेट बँकेचे अध्यक्ष सीएस शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचे उद्दिष्ट हे वित्तीय उत्पादने तयार करणे आहे. जे केवळ आर्थिक उत्पन्न वाढवत नाही तर ग्राहकांच्या स्वप्नांचाही विस्तार करते असे ते म्हणाले.

मध्यमवर्गीयांना होणार फायदा 

कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने लखपती योजना आणली आहे. हर घर लखपती योजनेंतर्गत, विशिष्ट रक्कम जमा केल्यावर विहित वेळेत 1 लाख रुपये किंवा त्याच्या पटीत जमा करण्यासाठी ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आली आहे. ही योजना मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. अनेक वेळा पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी व इतर गरजांसाठी पैशासाठी इकडे तिकडे मदत मागावी लागते. हे लक्षात घेऊन एसबीआयने आरडी योजना तयार केली आहे.

दरमहा 591 रुपयांची बचत

हर घर लखपती योजनेत 3 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे जमा करता येतात. यामध्ये दरमहा छोटी बचत करून एक लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळवता येते. सध्याच्या व्याजदरानुसार, जर तुम्ही दरमहा 591 रुपयांची बचत केली, तर तुम्ही 10 वर्षांत 1 लाख रुपयांची ठेव तयार करु शकता. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिक एकाच वेळी 574 रुपयांची बचत करुन 1 लाख रुपये कमवू शकतात. मात्र, दरमहा रक्कम जमा न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या RD साठी, दरमहा 9 रुपये दंड भरावा लागेल. पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या आरडी कालावधीसाठी, दरमहा सुमारे 12 रुपये दंड भरावा लागेल. याशिवाय, तुम्ही सतत 6 महिने रक्कम जमा केली नाही, तर बँक तुमचे खाते बंद करेल आणि जमा केलेली रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर करेल.

ही योजना वृद्धांसाठी सर्वोत्तम 

याशिवाय SBI ने 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी Patron FD योजना सुरू केली आहे. ही निश्चित योजना बँकेने आपल्या नवीन आणि जुन्या ग्राहकांसाठी तयार केली आहे. या योजनेत तुम्ही किमान 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 3 कोटी रुपये जमा करू शकता. तुम्ही सात दिवस ते 10 वर्षांपर्यंत रक्कम जमा करू शकता. मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHAMaharashtra Superfast : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 26 March 2025 : 5 PMABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 26 March 2025Ajit Pawar Vidhan Sabha Speech | गुलाबरावांनी पान टपरीवर काम केलं, झिरवाळांनी मजुरी केली..अजित पवारांचं दणदणीत भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
Embed widget