एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पगार जमा होताच 'हे' काम करा, मनस्ताप दूर करा, सविस्तर माहिती एका क्लिकवर

पगार येताच एक गोष्ट करणं गरजेचं आहे. ती म्हणजे गुंतवणूक. त्यानंतर पगार पूर्णपणे खर्च झाला तरी तुम्हाला मनस्ताप होणार नाही.

Salary : जर तुमचा पगार (Salary) तुमच्या खात्यात जमा झाल्याबरोबरच लगेच संपला तर ही सवय तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भविष्यात मोठ्या संकटात टाकू शकते. त्यामुळं पगार येताच एक गोष्ट करणं गरजेचं आहे. ती म्हणजे गुंतवणूक. त्यानंतर पगार पूर्णपणे खर्च झाला तरी तुम्हाला मनस्ताप होणार नाही. काही लोक असे असतात की कितीही पैसे मिळाले तरी ते वाचवू शकत नाहीत. अशा लोकांचा पगार त्यांच्या खात्यात जमा होतो आणि तो कुठे जातो हेही समजत नाही. पण बचत न करण्याची ही सवय तुमच्या भविष्यासाठी समस्या निर्माण करू शकते. 

जर तुम्ही कुटुंबाचे प्रमुख असाल आणि तुमच्यावर सर्व जबाबदाऱ्या असतील तर तुम्ही बचतीबाबत खूप गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला तसेच तुमच्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरं जावे लागेल. त्यामुळं तुमचा पगार खात्यात जमा होताच पैशांची गुंतवणूक करा. त्यानंतर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे सर्व छंद पूर्ण करा, तुम्हाला कोणताही पश्चाताप होणार नाही.

निश्चित रक्कम दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करा

बहुतेक लोकांचा पगार महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो. तुमचा पगार मिळताच तुम्हाला पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे तुमच्या उत्पन्नातील 20 टक्के रक्कम दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करा. ते पैसे पहिल्या आठवड्यातच कुठेतरी गुंतवा. जर तुमच्याकडे दुसरे खाते नसेल, तर ती रक्कम तुमच्या पगार खात्यातून पहिल्या आठवड्यातच गुंतवा.

गुंतवणुकीसाठी फक्त पहिला आठवडा निवडा 

गुंतवणुकीसाठी फक्त पहिला आठवडा निवडा कारण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही महिन्याच्या शेवटच्या महिन्यात गुंतवणूक कराल, तर काही वेळा खर्च इतका जास्त असतो की तुम्ही गुंतवणुकीची रक्कमही वाचवू शकत नाही. त्यामुळं गुंतवणुकीचे पैसे आगाऊ गुंतवा. यानंतर तुम्ही तुमच्या खात्यात शिल्लक असलेला पगार तुमच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार खर्च करू शकता.

कसं कराल नियोजन?

समजा तुम्हाला 40,000 रुपये पगार मिळाला, तर 40,000 रुपयांच्या 20 टक्के म्हणजे 8,000 रुपये गुंतवावे लागतील. आता तुमच्या मनात प्रश्न असेल फक्त 20 टक्के का? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, आर्थिक नियम सांगतो की, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कमाईतील 20 टक्के गुंतवणूक करावी. अशा परिस्थितीत तुमचा पगार कोणताही असो, तुम्ही नेहमी 20 टक्के गुंतवणूक करावी. जर तुम्हाला वाटत असेल की उर्वरित पैसे तुमच्यासाठी पुरेसे नाहीत, तर तुमच्या अनावश्यक खर्चात कपात करा, परंतु गुंतवणुकीच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. सुरुवातीला तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, पण हळूहळू ती तुमच्या सवयीचा भाग बनते.

कुठे करावी गुंतवणूक? 

आता प्रश्न असा पडतो की गुंतवणूक करायची कुठे? त्यामुळे आजकाल आरडी, पीपीएफ, एसआयपी, म्युच्युअल फंड यांसारख्या अनेक योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही दरमहा ठराविक रक्कम गुंतवू शकता. दीर्घकाळात मोठी रक्कम जोडू शकता. जर तुमची 20 टक्के रक्कम चांगली असेल तर तुम्ही ती विभागून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवू शकता.

जर तुम्ही 8,000 पैकी, तुम्ही 3,000 SIP मध्ये,3,000 PPF मध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवू शकता आणि 2,000 रुपये तुम्ही अल्पकालीन SIP सुरू करू शकता किंवा RD चालवू शकता. याशिवाय, जर तुम्ही EPFO ​​मध्ये योगदान देत असाल तर तुम्ही VPF द्वारे EPF मध्ये तुमचे योगदान देखील वाढवू शकता. तुम्हाला EPF मध्ये देखील खूप चांगले व्याज मिळते.

खर्चावर नियंत्रण ठेवा

तुम्हाला सिगारेट, दारु वगैरे व्यसन असेल तर ते सोडण्याचा प्रयत्न करा
महिन्यातून दोनदा बाहेर जेवायला जात असाल तर आता एकदा जा
क्रेडिट कार्डचा वापर झपाट्यानं कमी करा
जर तुम्ही मित्रांसोबत पार्ट्यांमध्ये पैसे खर्च करत असाल तर या सवयीवर नियंत्रण ठेवा
जर तुम्ही ऑफर्समुळे अनावश्यक खरेदी करत असाल तर या सवयीवर नियंत्रण ठेवा

महत्वाच्या बातम्या:

1200 रुपये पगारातून उभा केला 100 कोटींचा व्यवसाय, चष्मा विकून मिळवले करोडो रुपये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget