एक्स्प्लोर

महिलांसाठी सरकारची खास योजना, 50,000 ते 200000 लाखांच्या गुंतवणुकीवर किती फायदा?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) ही योजना भारत सरकारद्वारे (India Govt) चालवली जाते. ही एक ठेव योजना आहे. सरकार महिलांसाठी ही योजना चालवत असून, या योजनेद्वारे ठेवींवर आकर्षक व्याजदर दिला जातो.

Mahila Samman Savings Certificate : महिलांना आर्थिकदृष्या स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकारकडून विविध योजना (Special Scheme of Govt for Women) राबवल्या जातात. या माध्यमातून सरकारकडून आर्थिक पाठबळ दिलं जातं. अशीच एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजना. ही योजना भारत सरकारद्वारे (India Govt) चालवली जाते. ही एक ठेव योजना आहे. सरकार महिलांसाठी ही योजना चालवत असून, या योजनेद्वारे त्यांच्या ठेवींवर आकर्षक व्याजदराचा लाभ घेता येईल. 

महिलांच्या ठेवीवर 7.5 टक्के दराने व्याज 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत महिलांना 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. MSSC योजनेत महिला किमान 1000 रुपये आणि कमाल 2 लाख रुपये गुंतवू शकतात. दोन वर्षांनी योजना परिपक्व होईल आणि संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील. तुम्हालाही या सरकारी हमी योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर जाणून घ्या तुम्हाला 50,000, 100000, 150000 आणि 200000 रुपये गुंतवल्यावर किती फायदा होईल.

किती ठेवीवर तुम्हाला किती फायदा ?

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही या योजनेत 50,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला त्यावर दोन वर्षांत 8011 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर एकूण रक्कम 58,011 रुपये होईल. जर तुम्ही यामध्ये 1,00,000 रुपये गुंतवले तर 7.5 टक्के व्याजदराने तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी 1,16,022 रुपये मिळतील. जर तुम्ही या योजनेत 1,50,000 रुपये जमा केले तर तुम्हाला दोन वर्षांनी 1,74,033 रुपये मिळतील, म्हणजेच तुम्हाला फक्त 24,033 रुपये व्याज म्हणून मिळतील. जर तुम्ही या योजनेत 2,00,000 रुपये गुंतवले तर त्यावर 7.5 टक्के व्याज मिळेल. दोन वर्षांसाठी. यानंतर तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर व्याज म्हणून 32,044 मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 2,32,044 रुपये मिळतील.

 पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकांमध्ये खाते उघडू शकता

तुम्हालाही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकांमध्ये खाते उघडू शकता. कोणत्याही वयोगटातील महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलीच्या नावाने पालक खाते उघडता येते. खाते उघडताना, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रंगीत फोटो इत्यादी केवायसी कागदपत्रांची आवश्यकता असेल. दरम्यान, नियमांनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला आंशिक पैसे काढण्याची परवानगी मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही जमा केलेल्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम काढू शकता. म्हणजेच तुम्ही 2 लाख रुपये जमा केले असतील तर एक वर्षानंतर तुम्ही 80 हजार रुपये काढू शकता.

महत्वाच्या बातम्या:

मुलींसाठी खास योजना, सरकार उचलणार पदवीपर्यंतचा खर्च; योजनेची सविस्तर माहिती एका क्लिकवर  

महत्त्वाच्या बातम्या

9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget