एक्स्प्लोर

देशाची प्रतिमा 'अल्पसंख्यांक विरोधी' बनली तर भारतीय कंपन्यांचं नुकसान; रघुराम राजन यांचा सावधगिरीचा इशारा    

Former RBI Governor Raghuram Rajan: देशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

Former RBI Governor Raghuram Rajan: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन वेळोवेळी देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर भाष्य करत असतात तसंच चिंता व्यक्त करत असतात. देशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. रघुराम राजन यांनी म्हटलं आहे की, जगात भारताची प्रतिमा 'अल्पसंख्यांक विरोधी' बनली तर भारतीय कंपन्यांचं नुकसान होऊ शकतं. भारतीय उत्पादनांसाठी मार्केटमध्ये ही धोक्याची घंटा आहे.  

रघुराम राजन यांनी म्हटलं आहे की,  भारताची अशी प्रतिमा झाल्यानंतर विदेशी सरकारं आपल्या राष्ट्रावर विश्वास ठेवायला सहज तयार होणार नाहीत. अशामुळं गुंतवणूकदार आपल्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीनं पाहणं बंद करु शकतात. 

लोकशाहीमध्ये गोष्टी सोप्या नसतात...

टाइम्स नेटवर्कशी बोलताना माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की,  लोकशाहीमध्ये गोष्टी नेहमी सोप्या नसतात. यात नेव्हिगेशनची गरज असते. त्यांनी म्हटलं की, लोकशाहीत वेळोवेळी सर्व पक्षांशी चर्चा करावी लागते. गरज पडल्यास काही बदल देखील करावे लागतात. त्यांनी रशिया आणि चीनचं उदाहरण देत म्हटलं की, या देशांमध्ये चेक आणि बँलंस नसल्यानं त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय. 

अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावर बोलताना रघुराम राजन म्हणाले की, अल्पसंख्यांकांसोबत दुर्व्यवहार जगभरात चांगली प्रतिमा तयार करत नाही. अशामुळं चांगले गुंतवणूकदार दूर जाऊ शकतात, त्यांच्या तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोणामध्ये  विश्वासार्हता नसेल, असं राजन यांनी म्हटलं आहे.  

कोरोना महामारीचा तंत्रज्ञान आणि मोठ्या भांडवली कंपन्या लहान व्यवसाय आणि उद्योगांपेक्षा खूप जलद गतीने परिणाम झाला आहे. त्यांना कोरोनानं अधिक प्रभावित केलं आहे. मध्यमवर्गीय, लहान आणि मध्यम क्षेत्र आणि सर्वसामान्यांवर पडणारा परिणाम यावर सरकारने अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्यामुळे सरकारने काळजीपूर्वक विचार करून खर्च करायला हवा, असे रघुराम राजन म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

Raghuram Rajan on Economy : सरकारने काळजीपूर्वक खर्च करावा, RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा सल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget