Raghuram Rajan on Economy : सरकारने काळजीपूर्वक खर्च करावा, RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा सल्ला
Raghuram Rajan on Economy : सरकारने काळजीपूर्वक खर्च करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असा सल्ला अर्थशास्त्रज्ञ आणि आरबीआयचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी दिला आहे.
Raghuram Rajan on Economy : भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian Economy) काही गडद खड्डे आहेत त्यामुळे सरकारने काळजीपूर्वक खर्च करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असा सल्ला अर्थशास्त्रज्ञ आणि आरबीआयचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी दिला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला कोणतीही मोठी तूट होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. राजन यांनी सांगितले की, कोरोना महामारी देशाच्या अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारने आणखी काही पाऊले उचलणे आवश्यक आहे.
कोरोना महामारीचा तंत्रज्ञान आणि मोठ्या भांडवली कंपन्या लहान व्यवसाय आणि उद्योगांपेक्षा खूप जलद गतीने परिणाम झाला आहे. त्यांना कोरोनाने अधिक प्रभावित केले आहे. मध्यमवर्गीय, लहान आणि मध्यम क्षेत्र आणि सर्वसामान्यांवर पडणारा परिणाम यावरही सरकारने अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्यामुळे सरकारने काळजीपूर्वक विचार करून खर्च करायला हवा, असे राजन यांनी सांगितले आहे.
राजन यांनी पुढे सांगितले की, यावेळी भारताला फारसे आशावादी किंवा निराशावादी असण्याची गरज नाही. कोणत्याही अर्थसंकल्पाचा उद्देश जनतेचा तसेच बाजारपेठेचा विश्वास टिकवून ठेवणे असतो. अर्थव्यवस्था रुळावर कशी आणता येईल याचा निश्चित रोडमॅप असावा. ते विश्वसनीय असावे आणि दृश्यमान देखील असावे. अन्यथा ते निष्काळजीपणा दर्शवते.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- US Canada Border : चार भारतीयांचा गोठून मृत्यू, बेकायदेशीरपणे अमेरिका-कॅनडा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न
- Omicron : ओमायक्रॉन करतो मेंदूवर हल्ला, स्मरणशक्तीवर होऊ शकतो परिणाम
- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं निर्बंध, 'या' देशाच्या पंतप्रधानांनी स्वत:चं लग्न पुढं ढकललं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha