एक्स्प्लोर

Bank News : आणखी एका राष्ट्रीयकृत बँकेकडून किमान शिल्लक रक्कम शुल्क रद्द, 'या' चार बँकांकडून ग्राहकांना दिलासा 

Minimum Balance Charges : देशातील आणखी एका राष्ट्रीयकृत बँकेनं किमान शिल्लक रक्कम शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी तीन बँकांनी असाच निर्णय घेतला आहे. 

Bank News : देशातील सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी आणखी एक दिलासादायक अपडेट आहे. इंडियन बँकेनं त्यांच्या बँकेतील बचत खात्यात आता किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचा निर्णय रद्द केला आहे. इंडियन बँकेच्या नव्या निर्णयानुसार 7 जुलै 2025 पासून बचत खात्यांसाठीचा किमान शिल्लक रक्कम नियम रद्द केला आहे. त्यामुळं बँकेच्या खात्यात आता काही रक्कम शिल्लक ठेवावी लागणार नाही.  बँकेनं निश्चित केलेली किमान शिल्लक रक्कम खात्यात न ठेवल्यास शुल्क द्यावं लागणार नाही.  यापूर्वी  पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेनं देखील अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. 

इंडियन बँकेनं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक अधिकृत पोस्ट केली आहे. त्यानुसार किमान शिल्लक रक्कम नियम रद्द करण्याचं कारण सांगितलं आहे. बँकेच्या ग्राहकांचं वित्तीय समावेशन आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी  हा निर्णयघेतला आहे. 

बँकेनं म्हटलं की, तुमचा पैसा, तुमचा नियम, आता किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागणार नाही, कोणताही दंड आकारला जाणार नाही.7 जुलै 2025 पासून हा नियम लागू असेल. इंडियन बँकेनं म्हटलं की आम्ही एक ग्राहक केंद्रीत पाऊल 7 जुलै 2025 पासून राबवत आहेत. सर्व बचत खात्यांवरील किमान  रक्कम शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आलं आहे.  आम्हाला ही घोषणा करताना आनंद होत आहे. इंडियन बँकेच्या पोस्टनुसार त्यांनी हा निर्णय  वित्तीय समावेशन आणि समाजातील सर्व वर्गातील व्यक्तींना बँकिंग सुलभ आणि किफायतशीर करण्याचा प्रयत्न आहे. इंडियन बँक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेक, नियम आणि अटी लागू असं बँकेनं म्हटलं आहे.

यापूर्वी तीन बँकांकडून असाच निर्णय 

बँकांच्या नियमानुसार  सरासरी मासिक शिल्लक रक्कम ही बचत खातं सुरु ठेवायचं असल्यास खात्यात ठेवावी लागते. जर, एखाद्या खातेदारानं सरासरी मासिक शिल्लक रक्कम न ठेवल्यास बँकांकडून दंड आकारला जातो. बचत खात्याच्या प्रकारानुसार हा दंड वेगवेगळा असतो.  हा दंड करण्याचा निर्णय आता इंडियन बँकेनं घेतला आहे. यापूर्वी तीन बँकांनी अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियानं सर्वप्रथम सर्व प्रकारच्या बचत खात्यांमधील किमान शिल्लक रकमेचा नियम मागं घेतला होता. बँक खात्यात किमान शिल्लक न राखल्यास दंड न आकरण्याचा निर्णय स्टेट बँकेनं घेतला होता. स्टेट बँकेचा हा निर्णय 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे. 

कॅनरा बँकेनं देखील अशाच प्रकारचा निर्णय मे 2025 पासून लागू केला आहे.  बँकेनं सर्व प्रकारच्या बचत खात्यांवरील सरासरी किमान शिल्लक रक्कम नियमाचं पालन न केल्यास आकरण्यात येणारा दंड रद्द केला आहे. 

पंजाब नॅशनल बँकेनं देखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. पंजाब नॅशनल बँकेनं 1 जुलै 2025 पासून किमान शिल्लक रक्कम शुल्क रद्द केलं होतं. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget