(Source: ECI | ABP NEWS)
Indian Coder called Scammer : सोहम पारेखची एका दिवसाची कमाई अडीच लाख रुपये, एकाच वेळी अनेक कंपन्यांसोबत काम, ज्या तरुणामुंळ अमेरिकेत खळबळ उडाली
Soham Parekh : सोहम पारेखच्या सीवीनुसार तो मुंबई विद्यापीठातून पदवीधर आहे. तर, जॉर्जिया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे.

Soham Parekh: सोहम पारेख नावाचा भारतीय इंजिनिअर सध्या अमेरिकेत जोरदार चर्चेत आहे आणि व्हायरल देखील आहे. चर्चेच कारण देखील विशेष आहे कारण सोहमनं एकाच वेळी अनेक ठिकाणी काम केलं आहे. या माध्यमातून त्यानं जवळपास अडीच लाख रुपयांची कमाई देखील केली आहे. सोहम पारेखच्या व्हायरल सीवीनुसार त्यानं मुंबई विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. तर, जॉर्जिया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतून पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं आहे. सोहमच्या सीवी नुसार Dynamo, Union AI, Alan AI आणि Synthesia सह इतर कंपन्यांमध्ये काम केलं आहे.
सोहम पारेख चर्चेत का?
मिक्सपॅनेलचे सहसंस्थापक सुहेल दोशी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक्स वर एक पोस्ट केल्यानंतर सोहम पारेख चर्चेत आला. दोशी यांच्या मते भारतीय व्यक्ती सोहम पारेख एकाच वेळी तीन चार सार्टअप्स सोबत काम करत आहे. त्यांनी पुढं म्हटलं की हा व्यक्ती वाय कॉम्बिनेटर सारख्या कंपन्यांना टार्गेट करत आहे, त्यामुळं सर्वांना सावध राहावं. सोहम पारेखला एकाच आठवड्यात कामावरुन काढल्याचं सुहेल दोशींनी म्हटलं.
PSA: there’s a guy named Soham Parekh (in India) who works at 3-4 startups at the same time. He’s been preying on YC companies and more. Beware.
— Suhail (@Suhail) July 2, 2025
I fired this guy in his first week and told him to stop lying / scamming people. He hasn’t stopped a year later. No more excuses.
CV तील माहिती 90 टक्के खोटी : दोशी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सुहेल दोशी यांनी सोहम पारेखचा बायोडाटा 90 टक्के खोटा आहे. सोहम पारेखला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, ते सर्व प्रयत्न अपयशी ठरले, असं दोशींनी म्हटलं. इतर स्टार्ट अप्सचे संस्थापक देखील सोहम संदर्भात अशीच माहिती देत आहेत. Lindy चे संस्थापक Flo Crivello यांनी म्हटलं की एक आठवड्यापूर्वीच त्यांच्या कंपनीनं नोकरी दिली होती. मात्र, सकाळीच त्याला काढून टाकलं आहे. सोहम पारेखनं चांगली मुलाखत दिली होती. त्यानं चांगलं प्रशिक्षण घेतलं होतं, असं फ्लो क्रीवेल्लोनं म्हणाले.
दरम्यान, सुहेल दोशी यांच्याकडून त्यांच्या एक्स खात्यावरुन सोहम पारेख संदर्भात अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. आणखी काही स्टार्टसअपकडून देखील सोहम पारेख संदर्भात प्रतिक्रिया येत आहेत.
























