Rohit Sharma : विश्व चषकाच्या साक्षीनं पत्रकार परिषद, टी20 मधून निवृत्ती पण वनडे कसोटीचं काय? रोहितला प्रश्न, हिटमॅन म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्मानं भारताला दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकवून दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
बारबाडोस : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात टीम इंडियानं (Team India) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 7 धावांनी पराभूत केलं. रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांनी भारताला 17 वर्षानंतर विजेतेपद मिळवून दिलं. टीम इंडिया आणि देशभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहते आनंद साजरा करत असतानाच विराट कोहलीनं टी 20 क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराटच्या या निर्णयानंतर भारतीय चाहते सावरत असतानाच मॅच संपल्यानंतर रोहित शर्मानं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर रोहित शर्माला पत्रकारांनी फक्त आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीसह वनडे आणि कसोटीमधून निवृत्ती घेतलीय का असा प्रश्न विचारला.
Farewell, Rohit Sharma from T20is.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 29, 2024
- Captain, Leader, Legend. 🇮🇳(Video - ICC). pic.twitter.com/95qazwIL4D
रोहित शर्मानं इतिहास रचला
भारतात झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला होता. भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियानं जेतेपद मिळवल्यानं देशातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही टी 20 क्रिकेटपासून लांब होते. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर देखील सूर्यकुमार यादवकडे टी 20 वर्ल्ड कपचं नेतृत्त्व सोपवलं होतं. तर, भारतात जानेवारी महिन्यात झालेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये रोहितनं भारताचं टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्त्व केलं होतं. हार्दिक पांड्या देखील दुखापतीमुळं बाहेर होता. विराट कोहली वैयक्तिक कारणामुळं ती मालिका खेळलेला नव्हता. जानेवारीनंतर टीम इंडिया थेट जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. रोहित शर्माकडे नेतृत्त्व दिलं गेलेलं. हार्दिक पांड्याचं उपकॅप्टन म्हणून प्रमोशन करण्यात आलेलं होतं. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांची जोडी भारताच्या डावाची सुरुवात करत होती. एकीकडे रोहित धावा करत होता तर विराट फॉर्मसाठी संघर्ष करत होता. अखेरच्या मॅचमध्ये विराटला फॉर्म गवसला. विराटनं 76 धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजींनी दक्षिण आफ्रिकेच्या हातातून मॅच हिसकावून घेतली.
भारताच्या विजयानंतर दोन्ही खेळडू आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा याला निवृत्तीची घोषणा केल्यानंतर वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित शर्मानं एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार असल्याचं म्हटलं. रोहित शर्माच्या या घोषणेनं चाहत्यांना दिलासा मिळाला. रोहित शर्मा भारताकडून वन डे आणि कसोटी सामने खेळताना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, भारतीय संघाचं टी 20 क्रिकेटमधील नेतृत्व आता हार्दिक पांड्याकडे जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :