India Pakistan War Gold Rate : भारत-पाक तणावाचा सुवर्ण बाजारावर परिणाम; सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार, ग्राहक संभ्रमात, आज किती रुपयांची घसरण?
India Pakistan War Gold Rate : गेल्या आठवड्याभरापासून सोन्याच्या दरात मोठी चढउतार पाहायला मिळत असल्याने सोने खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे.

India Pakistan War Gold Rate : भारत पाक युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जळगाव सुवर्ण नगरीमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरापासून सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी चढउतार पाहायला मिळत असल्याने सोने खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे. सोने खरेदी बाबत ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था असल्याने ग्राहक खरेदीबाबत वेट अँड वॉचचे भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसात तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याने त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रात पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात आठवडाभरात पाच हजार रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर हे जीएसटीसह 100500 वर जाऊन पोहोचले होते. त्यात दोन दिवसात भारत आणि पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले सुरू झाल्याने शेअर बाजारात घसरण झाली आहे. परिणामी सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
सोन्याच्या दारात एक हजार रुपयांची घसरण
नेहमीचा ट्रेंड पाहिला तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर सोन्याचे दरात नेहमीच वाढ झाल्याचं पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आज एक हजार रुपयांची घसरण ही तात्पुरत्या स्वरुपातील असू शकते आणि पुढील काळात युद्ध परिस्थिती अजून गंभीर झाली तर सोन्याचे दर हे अजूनही वाढू शकतात, असा अंदाज सोने व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
ग्राहक संभ्रमात
तर सध्याच्या स्थितीत सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याने सोन्याचे दर अजून कमी होतील, असे काही ग्राहकांना वाटत आहे. तर, काही ग्राहकांना सोन्याचे दर अजून वाढतील अशी अपेक्षा असल्याने खरेदी करावी किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाल्याचे सोने व्यावसायिक सांगत आहेत. वाढलेले सोन्याचे दर हे सर्व सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरचे आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावी किंवा नाही हे कळत नाही. सोने खरेदीबाबत संभ्रमावस्था असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























