India Vs Pakistan War Opration Sindhoor मोठी बातमी : भारताच्या हल्ल्याची दाहकता हळूहळू दिसली, मसूद अझरच्या दोन्ही मेहुण्यांसह 5 बड्या दहशवाद्यांचा खात्मा, सर्वांची नावं समोर!
India Vs Pakistan War Opration Sindhoor: भारताच्या 7 मे रोजी हवाई कारवाई करत पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

India Vs Pakistan War Opration Sindhoor नवी दिल्ली: भारताच्या हवाई हल्ल्याची दहशत (Opration Sindhoor) आता हळूहळू समोर येत आहे. कारण भारताने 7 मे रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे हवाई अड्डे उद्ध्वस्त केले होते. यामध्ये कोण कोण दहशतवादी गेले, त्यांची नावं आता समोर आली आहेत. यामध्ये जैश प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा मेहुणा मोहम्मद जमिल, मुरिदके येथील 'मर्कज तैयबा'चा प्रमुख असलेला मुदस्सर यांचा समावेश आहे. मुदस्सरच्या अंत्यविधीला पाक सैन्याने गार्ड ऑफ ऑनर दिला होता.
भारताच्या 7 मे रोजी हवाई कारवाई करत पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या कारवाईत लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांशी संबंधित पाच मोठ्या दहशतवाद्यांचा समावेश होता. या सर्व दहशतवाद्यांची पाकिस्तानात सैन्याच्या उपस्थितीत गार्ड ऑफ ऑनर देत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. काही अंत्यविधींना पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.
१. मुदस्सर खडीयन खास ऊर्फ अबू जुनदल (लष्कर-ए-तैयबा)
मुरिदके येथील 'मर्कज तैयबा'चा प्रमुख असलेला मुदस्सर हा पाक लष्कराचा अत्यंत जवळचा होता. त्याच्या अंत्यविधीला पाक सैन्याने गार्ड ऑफ ऑनर दिला होता. पाक लष्करप्रमुख आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले होते. जमात-उद-दवाच्या (JuD) हाफिज अब्दुल रऊफने अंत्यप्रार्थना घेतली. कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिस आयजी उपस्थित होते.
२. हाफिज मोहम्मद जमिल (जैश-ए-मोहम्मद)
जैश प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा मोठा मेहुणा असलेला हाफिज जमिल बहावलपूरमधील 'मर्कज सुब्हान अल्लाह'चा प्रमुख होता. तो युवकांच्या धर्मांधतेसाठी कट्टर प्रचार करत होता आणि जैशसाठी निधी गोळा करण्यात सक्रिय होता.
३. मोहम्मद युसूफ अझहर ऊर्फ उस्ताद जी (जैश-ए-मोहम्मद)
मौलाना मसूद अझहर याचा दुसरा मेहुणा असलेल्या युसूफ याचा वापर जैशच्या शस्त्र प्रशिक्षणासाठी होत असे. जम्मू-काश्मीरमध्ये त्याने अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. तो IC-814 विमान अपहरण प्रकरणात वॉन्टेड होता.
४. खालिद ऊर्फ अबू अकाशा (लष्कर-ए-तैयबा)
खालिद हा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. तो अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करीत असे. त्याच्या फैसलाबादमध्ये झालेल्या अंत्यविधीला पाक लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.
५. मोहम्मद हसन खान (जैश-ए-मोहम्मद)
पाकव्याप्त काश्मीरमधील जैशच्या ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मीरी याचा मुलगा मोहम्मद हसन जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचे समन्वयक म्हणून काम करत होता.
या कारवाईनंतर पाकिस्तानमधील लष्कर आणि प्रशासनाच्या समर्थनाने चालणाऱ्या दहशतवाद्यांच्या वास्तव्यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. भारताच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या दुटप्पीपणा उघडा पडला आहे.

























