एक्स्प्लोर

India vs Pakistan : भारताची एक खेळी अन् पाकिस्तानसह चीनला धक्का, अब्जावधींचं नुकसान सुरु, चीनचे अंदाज फसले 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शस्त्रसंधीचा निर्णय झाल्यानं थांबला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा केली. यानंतर चीनला मोठा फटका बसला आहे. 

नवी दिल्ली : भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं. ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील एकूण 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करत ते उद्धवस्त केले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारताच्या लष्करी तळांवर ड्रोन पाठवून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतानं ते हल्ले परतवून लावले, याशिवाय पाकिस्तानच्या काही लष्करी तळांवर देखील हल्ले केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढत होता याचा सर्वाधिक फायदा चीनला मिळाला होता. चीनच्या स्टॉक मार्केटमध्ये भारत आणि पाकिस्तान वादामुळं शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी आली होती.मात्र, त्यानंतर त्यामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.  

युद्धाच्या शक्यतेनं चीन शेअर बाजारात तेजी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष सुरु असताना गुंतवणूकदारांनी अंदाज लावला की चीन पाकिस्तानला अधिक शस्त्र पुरवठा करेल. यामुळं गुंतवणूकदारांनी चीन मधील शस्त्र निर्मिती कंपन्यांच्य स्टॉक मध्ये गुंतवणूक केली. 8 मे रोजी AVIC या चेंगदू एअरक्राफ्टे शेअर 16 टक्क्यांनी वाढले होते. या कंपनीकडून चीनला पाकिस्तानला J-10 C फायटर जेटचा पुरवठा केला जातो. तर, AVIC एअरोस्पेसचे शेअर 6 टक्क्यांनी वाढले होते. लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर या कंपनीकडून बनवले जातात. चीन स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशनचे शेअर देखील वाढले होते. पाकिस्तानच्या नौदलाला लढाऊ नौका चीनच्या या कंपनीकडून पुरवले जातात.  

शस्त्रसंधी आणि चीनच्या संरक्षण कंपन्यांचे शेअर घसरले

10 मे  रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दोन्ही देशांनी शस्त्रसंधी जाहीर करावी यासाठी मध्यस्थी केल्याचं जाहीर केलं होतं. भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी होताच चीनच्या या कंपन्यांचे स्टॉक्स गडगडले.  AVIC चेंगदू एयरक्राफ्ट हा शेअर 7.4 टक्क्यांनी घसरला. चाइना स्टेट शिपबिल्डिंगचा स्टॉक 4 टक्क्यांनी घसरला. Zhuzhou Hongda Electronics चा शेअर 6.34 टक्क्यांनी घसरला.  

पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून चीनकडून शस्त्र खरेदी करत आहे. एसआयपीआरआयच्या आकडेवारीनुसार 2019-2023 दरम्यान पाकिस्ताननं चीनकडून 5.28 अब्ज डॉलर्सची शस्त्र खरेदी केली. पाकिस्तानच्या एकूण आयातीपैकी 81 टक्के आयात चीनकडून होते. चीननं पाकिस्तानला  JF-17 थंडर जेट, SH-15 आर्टिलरी गन आणि नौसैनिक जहाज दिलेत.

चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर (CPEC) अंतर्गत चीन पाकिस्तानमध्ये 60 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. या प्रकल्पात चीन चे कर्मचा आणि संपत्तीची सुरक्षेचा समावेश आहे. ज्यामुळं पाकिस्तानला शस्त्र आवश्यक आहेत.  

संरक्षण कंपन्यांना धक्का

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेला तणाव कायम राहिला असता तर चीनकडून पाकिस्तानला निर्यात वाढली असती. शस्त्रसंधी झाल्यामुळं चीनच्या शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget