एकदा पैशांची गुंतवणूक करा, आयुष्यभर 1 लाख रुपये मिळवा, जाणून घ्या LIC च्या 'या' योजनेचे जबरदस्त फायदे
आज आपण देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या एका योजनेबद्दल सांगणार आहोत. निवृत्तीच्या काळात या योजनेमुळं तुम्हाला मोठा आधार मिळू शकतो.

LIC : प्रत्येकजण त्यांच्या कमाईतून काही रक्कम वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकजण बचत केलेली रक्कम चांगल्या ठिकाणी गुंतवण्याची योजना देखील आखतत. दरम्यान, पैशांची गुंतवणूक (invetsment) करताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात. गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षित राहतील आणि दुसरे म्हणजे त्यावर मिळणारा परतावा. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण आज आपण देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या एका योजनेबद्दल सांगणार आहोत. निवृत्तीच्या काळात या योजनेमुळं तुम्हाला मोठा आधार मिळू शकतो.
एलआयसीची निवृत्ती योजना खूप लोकप्रिय आहे. जी तुम्हाला निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते. या योजनेचे नाव एलआयसी न्यू जीवन शांती योजना (LIC New Jeevan Shanti Plan ) आहे. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
एलआयसीची नवीन जीवन शांती योजना तुम्हाला गुंतवणुकीद्वारे निवृत्तीनंतर नियमित पेन्शनची हमी देते. म्हणजे त्यात एकदा गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला निवृत्तीनंतर आयुष्यभर पेन्शन मिळत राहते. ही पॉलिसी घेण्यासाठी वयोमर्यादा 34 ते 79 वर्षे आहे. या योजनेत कोणतेही जोखीम कव्हर नाही, परंतु ते देत असलेले फायदे खूप लोकप्रिय आहेत. या योजनेत तुम्हाला कंपनीकडून दोन पर्याय मिळतात. यापैकी पहिले म्हणजे सिंगल लाईफसाठी डिफर्ड अॅन्युइटी, दुसरे म्हणजे जॉइंट लाईफसाठी हेफ्टी अॅन्युइटी. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही एका योजनेत गुंतवणूक करू शकता.
एलआयसीची नवीन जीवन शांती योजना काय?
एलआयसी न्यू जीवन शांती प्लॅन ही एक अॅन्युइटी प्लॅन आहे. ते खरेदी केल्यानंतर, तुम्ही त्यात तुमची पेन्शन मर्यादा निश्चित करू शकता. यामध्ये निश्चित केलेले पेन्शन तुम्हाला निवृत्तीनंतर आयुष्यभर दिले जाते. जर तुम्ही ही योजना वयाच्या 55 व्या वर्षी खरेदी केली तर त्यावेळी तुम्हाला 11 लाख रुपये जमा करावे लागतील आणि ते पाच वर्षांसाठी ठेवावे लागतील. मग तुम्हाला तुमच्या एकरकमी रकमेवर वार्षिक 101880 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते. सहा महिन्यांच्या आधारावर मिळणारी पेन्शनची रक्कम 49911 रुपये असेल आणि मासिक पेन्शन 8149 रुपये असेल.
किमान गुंतवणूक 1.5 लाख रुपयापर्यंत
अलिकडच्या काळात नवीन जीवन शांती योजनेसाठी वार्षिकी दर देखील वाढवण्यात आले आहेत. या योजनेत कोणीही गुंतवणूक करू शकतो. यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही ही योजना कधीही सोडून देऊ शकता आणि त्यात किमान 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक देखील करू शकता. यासाठी कमाल मर्यादा नाही. या कालावधीत, जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते.
महत्वाच्या बातम्या:






















