(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Income Tax Refund : आयकर विभागाकडून 1.67 लाख कोटींचा कर परतावा; तुमच्या खात्यात आले का पैसे?
Income Tax Refund : आयकर विभागाने कर परतावा जारी केला आहे. आयकर विभागाने ही माहिती दिली आहे.
Income Tax Refund: आयकर विभागाने कर परतावा जारी केला आहे. आयकर भरलेल्या करदात्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. बुधवारी आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक एप्रिल 2021 ते 7 फेब्रुवारी 2022 दरम्यान आयकर विभागाने 1.87 कोटी करदात्यांना 1.67 लाख कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे.
आयकर विभागाने सांगितले की 1,85,65,723 प्रकरणांमध्ये 59,949 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे. तर 2,28,100 प्रकरणांमध्ये 1,07,099 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा जारी करण्यात आला आहे. त्याच वेळी, मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी 1.48 कोटी प्रकरणांमध्ये 28,704.38 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे.
CBDT issues refunds of over Rs. 1,67,048 crore to more than 1.87 crore taxpayers from 1st Apr,2021 to 7th February,2022. Income tax refunds of Rs. 59,949crore have been issued in 1,85,65,723cases &corporate tax refunds of Rs. 1,07,099crore have been issued in 2,28,100cases(1/2)
— Income Tax India (@IncomeTaxIndia) February 9, 2022
कर परतावा म्हणजे काय?
आर्थिक वर्षात तुमच्या अंदाजित गुंतवणुकीच्या आधारे आगाऊ रक्कम कापली गेली असेल. मात्र, आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत कागदपत्रे जमा केल्यानंतर ही कापलेली रक्कम तुम्हाला पुन्हा दिली जाते. त्यासाठी ITR Refund साठी अर्ज करावा लागणार आहे.
परतावा मिळण्यास अडचणी
कधीकधी परतावा मिळण्यास उशीर होतो. आयकर विभागाकडून कर परतावा फक्त बँक खात्यात पाठवला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही फॉर्म भरताना चुकीची माहिती दिली असेल किंवा तुमचा तपशील जुळत नसेल तर तुमचा कर परतावा मिळण्यास अडचणी निर्माण होतात.
असे पाहा रिफंड स्टेट्स
>> नवीन आयकर पोर्टलवरून कर परतावा स्थिती अशी तपासा
> तुम्हाला सर्वप्रथम www.incometax.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
> येथे तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल.
> तुम्ही लॉग इन केल्यावर तुम्हाला ई-फायलिंगचा पर्याय दिसेल.
> ई-फाइल पर्यायामध्ये, तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न निवडावे लागेल.
> यानंतर, View File Return वर क्लिक करा.
> आता तुमच्या ITR चे नवे तपशील येतील.
> त्यानंतर तुमच्या ITR ची स्थिती दिसेल.
> येथे तुम्हाला कर परतावा जारी करण्याची तारीख आणि रक्कम दिसेल.
> याशिवाय तुमच्या रिफंडच्या क्लिअरन्सची माहितीही उपलब्ध होईल.