(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IMPS Money Transfer: ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणाऱ्यांना पाच लाखांपर्यंत रक्कम सहज पाठवता येईल, नवा नियम समजून घ्या
IMPS Money Transfer: NPCI ने 31 ऑक्टोबर रोजी एक परिपत्रक जारी केले होते आणि आता 1 फेब्रुवारीपासून IMPS च्या नियमांमध्ये बदल होणार आहे. यामुळे ऑनलाईन पैसे पाठवणे खूप सोपे होणार आहे.
IMPS Money Transfer: जर तुम्ही ऑनलाइन पैसे (Online Payment Transfer) पाठवत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही फक्त 1-2 लाख रुपये नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाईन पद्धतीने सहज पाठवू शकता. त्यासाठी IMPS म्हणजेच इमीडिएट पेमेंट सर्विसचा वापर करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोन बँकिंग किंवा नेट बँकिंगशी जोडावं लागेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल तर तुमचे काम सोपं होईल.
सध्याच्या नियमांनुसार, IMPS द्वारे मोठी रक्कम पाठवण्यासाठी, लाभार्थीचे नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला थोडा जास्त वेळ लागतो. परंतु नवीन नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी प्रक्रिया करावी लागणार नाही. तुम्ही फक्त बँक खात्यात नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि नावाद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट ट्रान्सफर करू शकता.
हा बदल 1 फेब्रुवारीपासून लागू
यासाठी NPCI ने 31 ऑक्टोबर रोजी एक परिपत्रक जारी केले होते आणि आता 1 फेब्रुवारीपासून IMPS चे नियम देखील बदलणार आहेत. त्या आधारे कोणतीही व्यक्ती, कोणत्याही लाभार्थीचे नाव न जोडता 5 लाख रुपयांपर्यंत निधी हस्तांतरित करू शकते. सध्या जोपर्यंत लाभार्थी तपशील जोडले जात नाहीत तोपर्यंत निधी हस्तांतरित केला जाऊ शकत नाही.
काय फायदे होतील?
आता तुम्ही फक्त बँक खातेदाराचा मोबाईल नंबर जोडून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकता. साहजिकच तुम्हाला लाभार्थीचे नाव आवश्यक असेल, परंतु तुम्ही लांबलचक प्रक्रियेपासून वाचाल आणि कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पैसे सहज हस्तांतरित करू शकाल.
तुम्ही IMPS द्वारे पैसे कसे पाठवू शकता?
- तुमचे मोबाइल बँकिंग ॲप उघडा.
- तुम्हाला मुख्य पृष्ठावर जाऊन 'फंड ट्रान्सफर' पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- पुढील प्रक्रियेसाठी निधी हस्तांतरणासाठी 'IMPS' पद्धत वापरा.
- लाभार्थीचा MMID (मोबाइल मनी आयडेंटिफायर) आणि MPIN (मोबाइल वैयक्तिक ओळख क्रमांक) प्रविष्ट करा.
- ॲपमध्ये तुम्हाला किती पैसे ट्रान्सफर करायचे आहेत ते एंटर करा.
- सर्व तपशील तपासल्यानंतर, पुढे जाण्यासाठी पुष्टी करा वर क्लिक करा.
- तुम्हाला एक OTP प्राप्त होईल आणि हा व्यवहार प्रमाणित करण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
- तुमच्या फोनवर OTP येईल आणि तुम्ही तो टाकून तुमचा व्यवहार पूर्ण करू शकता.
ही बातमी वाचा: