घरांच्या विक्रीत मोठी वाढ! घरांच्या विक्रीत मोठी वाढ! 2023 अखेरपर्यंत 5 लाखाहून अधिक घरांच्या विक्रीचा अंदाज
2023 हे वर्ष भारतीय व्यापार जगतासाठी चांगले ठरले आहे.व्याजदरात कपात झाली नसतानाही घरांच्या विक्रीत मोठी वाढ (increase Home sold) झाली आहे.
Year Ender 2023: 2023 हे वर्ष भारतीय व्यापार जगतासाठी चांगले ठरले आहे. व्याजदरात कपात झाली नसतानाही घरांच्या विक्रीत मोठी वाढ (increase Home sold) झाली आहे. रिअल इस्टेट (real estate) क्षेत्रातही वर्षाचा शेवट उत्साहवर्धक विक्रीसह होईल, अशी अपेक्षा आहे. यावर्षी देशातील टॉप-7 मेट्रो शहरांमध्ये 3.49 लाख घरांची विक्री झाली आहे. 2022 मध्ये हा आकडा 3.65 लाख युनिट होता. 2023 च्या अखेरीस हा आकडा सुमारे 5 लाख घरांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा एक नवीन विक्रम असण्याची शक्यता आहे. घरांच्या खरेदीवर सुमारे 5 लाख कोटी रुपये खर्च होऊ शकतात.
9 महिन्यांत देशातील 7 मोठ्या शहरांमध्ये 3.5 लाख घरांची विक्री
रिअल इस्टेट सल्लागार एनरॉकच्या आकडेवारीनुसार, वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत देशातील 7 मोठ्या शहरांमध्ये सुमारे 3.5 लाख घरांची विक्री झाली आहे. या घरांच्या खरेदीवर सुमारे साडेचार लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. 2022 च्या तुलनेत घर खरेदीसाठी 38 टक्के जास्त पैसा खर्च झाला आहे. 2022 मध्ये केवळ 3.65 लाख घरांची विक्री झाली होती.
सणासुदीच्या काळात घरांच्या खरेदी वाढ
सणासुदीच्या काळात घरांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. डिसेंबर अखेरपर्यंत एकूण 5 लाख घरांची विक्री होण्याची शक्यता आहे. या काळात दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. प्रीमियम विभागातील घरांच्या मागणीत एवढी वाढ कधीच दिसली नाही. मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक मागणी दिसून आली आहे. अहवालानुसार, कोविड-19 महामारीनंतर लोक मोठी घरे घेण्याचा विचार करत आहेत.
अलिशान घरांना सर्वाधिक मागणी
आता प्रीमियम आणि अलिशान घरांना गुंतवणुकीसाठी सर्वाधिक मागणी आहे. उच्च उत्पन्न गट (HNI) आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांना (NRI) अशी मोठी घरे हवी आहेत. जगातील विविध देशांमध्ये सुरू असलेल्या राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे अनिवासी भारतीयांना त्यांच्या स्वत:च्या देशात पैसे परत गुंतवायचे आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय श्रीमंतांना परदेशात मालमत्ता खरेदी करण्यात जास्त रस होता.
आलिशान घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 75 टक्क्ची वाढ झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान आलिशान घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 75 टक्क्यांची वाढ झाली आहे. अनेक नवीन प्रकल्प सुरु करताना ही मागणी लक्षात घेऊन विकासकांनी व्हिला, कॉन्डो आणि स्वतंत्र घरे तयार केली आहेत. व्याजदर स्थिर ठेवून रिअल इस्टेट क्षेत्राच्या वाढीसाठी आरबीआयनेही खूप मदत केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: