एक्स्प्लोर

Home Loan : गृहकर्जदारांना धक्का, देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेच्या निर्णयानं गृहकर्जाचा हप्ता वाढणार, प्रमुख बँकांचे व्याज दर जाणून घ्या

Home Loan :  देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेनं गृहकर्जाच्या व्याजदरासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळं गृहकर्जाचा हप्ता वाढणार आहे. 

Home Loan नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेनं त्यांच्या गृहकर्जदारांना मोठा धक्का दिला आहे. बँकेनं गृहकर्जाच्या दरात वाढ केली आहे. बँकेनं तीन वर्षांच्या MCLR मध्ये 0.05 टक्क्यांची वाढ केली आहे. मात्र,बँकेनं व्यवसाय कर्ज आणि गृहकर्जाशी संबंधित दर 0.05 टकक्यांनी कमी केला आहे, यामुळं येत्या काळात नवं व्यवसाय कर्ज आणि गृहकर्ज स्वस्त होऊ शकतं. 

एचडीएफसी बँकेनं मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस्ड लेंडिंग रेटसमध्ये 0.05 टक्क्यांची वाढ आणि कपात दोन्ही वेगळ्या कालावधींवर केलं आहे. हे दर 7 मे पासून लागू झाले आहेत. एमसीएलआर मधील कपातीचा फायदा अशा ग्राहकांना होईल ज्यांचं कर्ज शॉर्ट- टर्म MCLR शी संबंधित आहे, त्यांना फायदा होईल. मात्र, गृहकर्जदारांना याचा फटका बसू शकतो, कारण येत्या कालावधीत त्यांचे ईएमआय वाढण्याची शक्यता आहे. MCLR म्हणजे असा व्याज दर  ज्यापेक्षा कमी दरानं बँका कर्ज देऊ शकत नाहीत.  आरबीआयनं एमसीएलआर प्रक्रिया 2016 पासून सुरुवात केली आहे.

मे महिन्यातील गृहकर्जाचा व्याज दर किती?

गृहकर्ज काढताना सर्वात कमी व्याज दर कोणती बँक किंवा कोणती हाऊसिंग फायनान्स संस्था देतेय हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण व्याजदरातील थोडासा फरक ईएमआयच्या रकमेवर परिणाम करतो. कमी व्याजदरावर कर्ज घेतल्यास कर्जदारांना दीर्घकालीन फायदा होतो. 

आरबीआयनं एप्रिल महिन्यात रेपो रेटचा दर 5.25 टक्के निश्चित केलेला आहे. गृहकर्जाचा व्याज दर रेपो रेटशी संबंधित असतो. रेपो रेट वाढल्यास गृहकर्जाचा व्याज दर वाढतो आणि रेपो रेट कमी झाल्यास गृहकर्ज कमी व्याज दरानं मिळते.

सार्वजनिक बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर (टक्क्यांमध्ये)

स्टेट बँक ऑफ इंडिया : 7.25 -8.95
बँक ऑफ बडोदा :7.20-9.60
यूनियन बँक ऑफ इंडिया : 7.15-9.60
पंजाब नॅशनल बँक: 7.25 - 9.30 
बँक ऑफ इंडिया : 7.10 -10.25
कॅनरा बँक : 7.25 - 9.25
बँक ऑफ महाराष्ट्र : 7.10 -9.90
पंजाब अँड सिंध बँक : 7.30- 10.70
इंडियन ओवरसीज बँक :7.10 टक्क्यांपासून
इंडियन बँक : 7.15 - 9.55
सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 7.10 - 9.15 

खासगी बँकांचा व्याज दर

कोटक महिंद्रा बँक,आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, एचएसबीसी बँक, साऊथ इंडियन बँक, करुर व्यस्य बँक, कर्नाटक बँक, फेडरल बँक, तामिळनाड मर्चंटाइल बँक, आरबीआएल बँक, सीएसबी बँक, सिटी यूनियन बँक या खासगी बँकांचा व्याज दर 7.20 टक्क्यांपासून 11.90 टक्क्यांदरम्यान आहे. 
 
एलआयसी हाऊसिंग फायनान्स, बजाज हाऊसिंग फायनान्स, टाटा कॅपिटल, पीएनबी हाऊसिंग फायनान्स, जीआयसी हाऊसिंग फायनान्स, एमसएमएफजी इंडिया होम फायनान्स,सम्मान कॅपिटल, आदित्य बिर्ला कॅपिटल, आयसीआयसीआय होम फायनान्स, गोदरेज हाऊसिंग फायनान्स अशा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे व्याज दर 7.15 टक्क्यांपासून 10 टक्क्यांपर्यंत आहेत.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

UPI Transaction Charges : तुमच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार? सरकारचे दोन नवे फॉर्म्युले; दुकानदारांवर काय होणार परिणाम?
तुमच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार? सरकारचे दोन नवे फॉर्म्युले; दुकानदारांवर काय होणार परिणाम?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget