एक्स्प्लोर

Home Loan : गृहकर्जाची ठरलेल्या वेळेपूर्वी परतफेड कशी करायची? तीन स्मार्ट पर्याय ज्यानं कर्ज लवकर संपेल अन् लाखो रुपयांची होईल बचत

Home Loan EMI : स्वत:च्या हक्काचं घर खरेदी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, घर खरेदी करताना घेतलेल्या गृहकर्जाची परतफेड किती दिवस करायची असा अनेकांना प्रश्न असतो.

नवी दिल्ली : प्रत्येकाला स्वत: च्या मालकीचं हक्काचं घर असावं असं वाटत असतं. घर खरेदीचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण आनंदी असतो. मात्र, घर खरेदी करताना अनेकांना गृहकर्ज घ्यावं लागतं. गृह कर्ज 20 ते 30 वर्षांच्या कालावधीसाठी घ्यावं लागतं. ज्याची परतफेड करताना अनेकदा पगाराच्या 50 टक्के रक्कम गृहकर्जाच्या EMI साठी खर्च होते. गृहकर्जाचे हप्ते किती दिवस फेडायचे अशी मानसिकता अनेकजणांची तयार होते, ज्याचा तणाव देखील येत असतो.

जर एखाद्या व्यक्तीनं 50 लाखांचं गृह कर्ज घेतलं तर त्याची पूर्ण परतफेड करताना बँकांना जवळपास तितकीच रक्कम व्याज म्हणून द्यावी लागते. मात्र, घाबरण्याची गरज नाही, काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचं गृहकर्ज काही वर्षांमध्ये पूर्णपणे फेडू शकता आणि त्यामुळं व्याज म्हणून जाणारे लाखो रुपये देखील वाचू शकतात. या तीन मार्गांची आपण माहिती घेणार आहोत.

दर महिन्याला EMI वाढवा

गृहकर्जाचा हप्ता भरत असताना सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग म्हणजे तुम्हाला दरमहा EMI पेक्षा अधिक रक्कम भरायची आहे. समजा तुमचा EMI 40000 रुपये असेल तर तुम्ही दरमहा 45000 रुपये भरण्याचा प्रयत्न करा, यामुळं तुमच्या मुद्दलाच्या रकमेतील 5000 रुपये कमी होतील. जेव्हा मुद्दल कमी होती त्यावेळी त्यावर आकारलं जाणारं व्याज देखील कमी होतं. यामुळं कर्ज निश्चित वेळेपेक्षा लवकर संपते. दरवर्षी ज्या प्रमाणात तुमचा पगार वाढतो त्या प्रमाणे EMI ची रक्कम वाढवल्यास त्याचा देखील फायदा कर्ज लवकर संपण्यास होतो.

वर्षातून एकदा प्रीपेमेंट

काही पगारदार व्यक्तींना वर्षातून एकदा दिवाळी बोनस, इन्सेंटिव्ह किंवा इतर अतिरिक्त उत्पन्न मिळत असेल तर ते इतर गोष्टींवर खर्च करतो. तुम्हाला जर अशा प्रकारची रक्कम मिळाल्यास तुम्ही त्याचा वापर गृह कर्जाचं प्रीपेमेंट करण्यासाठी करु शकता. प्रीपेमेंटद्वारे भरलेली रक्कम थेट मुद्दलात जमा होत असल्यानं फायदा होता. मुद्दल कमी झाल्यास कर्ज परतफेडीमध्ये फायदा होता. मुद्दल कमी झाल्यास व्याज देखील कमी भरावं लागतं.

गृह कर्ज ट्रान्सफर करणे :

जर तुम्ही एखाद्या बँकेतून गृहकर्ज घेतलं असेल आणि दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्याचा विचार करत असाल तर याद्वारे तुम्ही शिल्लक असलेलं मुद्दल ट्रान्सफर करु शकता. जर तुम्ही 9.5 टक्क्यांनी गृह कर्ज घेतलेलं आहे आणि तुम्हाला दुसरी बँक 8.5 टक्क्यांनी कर्ज देत असेल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. 0.5 टक्के ते 1 टक्के व्याज दर कमी झाल्यास लाखो रुपयांची बचत होऊ शकते.यामध्ये प्रोसेसिंग फी लागते मात्र लाखांमध्ये रक्कम वाचणार असेल तर नाममात्र प्रोसेसिंग फी भरणं योग्य ठरु शकतं. मात्र, गृह कर्ज ट्रान्सफर करायचं असल्यास किमान 5 ते 7 वर्षांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणं आवश्यक आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget