Home Loan : गृहकर्जासाठी अर्ज करताय, 'या' चुका टाळल्यास कर्ज मंजूर होईल अन् घराचं स्वप्न पूर्ण होणार, गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या
Home Loan : गृह कर्ज घेताना क्रेडिट स्कोअर, नोकरीची स्थिरता, संपत्तीशी निगडित एखादी चूक तुमचा गृह कर्जाचा अर्ज नामंजूर होऊ शकतो.

नवी दिल्ली : भारतातील महागनरांमध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये घर खरेदी करायचं असल्यास प्रत्येकाला गृह कर्जासाठी सार्वजनिक बँका, खासगी बँका किंवा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडे कर्जासाठी जावं लागतं. गृहकर्ज सहजपणे मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र, अनेकदा अर्जदारांची कर्जाची फाईल सुरुवातीच्या चौकशीवेळीच अडकते. याचं कारण बँका गृह कर्ज देताना प्रत्येक गोष्टींची चौकशी करतात. एखादी छोटी चूक देखील गृह कर्ज नामंजूर होण्यास कारणीभूत ठरू शकते.
तुम्ही जेव्हा गृहकर्जासाठी अर्ज करता तेव्हा बँका पहिल्यांदा तुमचं उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअर पाहते. जर तुमचं उत्पन्न कमी असेल किंवा क्रेडिट स्कोअर बँकेच्या निश्चित मर्यादेपेक्षा कमी असेल तर अर्ज पुढं जात नाही. जर, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते. कमी क्रेडिट स्कोअर असल्यास बँका जादा व्याज वसूल करतात.
जुने कर्ज आणि ईएमआयचा परिणाम
जर तुम्ही यापूर्वी कर्ज किंवा क्रेडिट कार्डची ईएमआय वेळेवर भरला नसेल तर त्याची नोंद क्रेडिट स्कोअरमध्ये होत असते. तुमचं सध्या कोणतं कर्ज सुरु असेल तर बँका तुमच्या कर्ज भरण्याच्या क्षमतेबाबत सतर्क होते. अधिक ईएमआय असल्यास अर्ज नामंजूर होतो.
बहुतांश बँका गृह कर्ज देताना किमान उत्पन्नाची अट निश्चित करतात. सर्वसाधारणपणे 30 हजार रुपये प्रत्येक महिन्याचं उत्पन्न असेल किंवा त्यापेक्षा कमी पगार असेल तर कर्जासाठी हे पुरेसं उत्पन्न नाही. गृह कर्ज मिळण्यासाठी उत्पन्न अधिक असणं आवश्यक आहे.
बँका ज्यांची नोकरी स्थिर असते त्यांना गृहकर्ज देण्यासाठी प्राधान्य देतं. वारंवार नोकरी बदलणाऱ्या, कंत्राटी नोकऱ्या करणाऱ्यांना किंवा नोकरी अस्थिर असल्यास बँका जोखीम अधिक आहे म्हणून कर्ज नामंजूर होऊ शकतं.
कर्जाच्या अर्जात नाव, पत्ता, वय किंवा चुकीची माहिती दिल्यास बँकांसाठी अर्जाची पडताळणी अवघड होते. त्यामुळं अर्ज नामंजूर होऊ नये म्हणून अर्जातील माहिती व्यवस्थित लिहा.
मालमत्तेचं मूल्यांकन
गृहकर्ज मंजूर होत असताना कर्जदाराची आर्थिक स्थिती जशी महत्त्वाची असते, त्यासोबतच ज्या मालमत्तेसाठी कर्ज घेणार आहे, त्याचं स्थान, स्थिती आणि बांधकामाची गुणवत्ता याचं मूल्यांकन बँका ठरवतात. बँकेला मालमत्तेची किंमत कमी वाटल्यास जोखीम अधिक असल्याचं ठरवत बँकांकडून अर्ज नामंजूर केला जाऊ शकतो.
एखादा बिल्डरची मालमत्ता ज्याला ब्लॅकलिस्टेड केलेली आहे त्याच्याकडून घर खरेदी केल्यास बँका गृहकर्ज मंजूर करु शकत नाहीत त्यामुळं गृह कर्ज देताना बँका जुन्या मालमत्तेच्या खरेदीसाठी गृह कर्ज देत नाहीत.
गृह कर्जासाठी अर्ज करताना तुमचं उत्पन्न, क्रेडिट स्कोअर, नोकरीची स्थिती आणि मालमत्तेसंदर्भातील योग्य कागदपत्रं तयार ठेवणं आवश्यक आहे. गृहकर्ज नामंजूर होऊ नये म्हणून काही गोष्टींची सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.























