एक्स्प्लोर

मुंबई आणि पुण्यातील प्रतिभावंतांच्या संख्येत उच्च तंत्रज्ञान उद्योगाचे योगदान 33 टक्के; टीमलीज डिजिटलचा अहवाल

पुणे भाग ऑटोमोटिव क्षेत्रात चालक म्हणून उदयाला येत असून या भागाचा भांडवल बाजारांमधील सहभागही लक्षणीय आहे.

मुंबई: टीमलीज डिजिटल या आघाडीच्या टेक स्टाफिंग व लर्निंग सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीने आर्थिक वर्ष २५ साठी भारतभरातील ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्सचे (जीसीसी) राज्यवार वितरण जाहीर केले आहे. हा डेटा टीमलीज डिजिटलच्या संशोधनावर आधारित असून, जीसीसींच्या प्रादेशिक केंद्रीकरणाबद्दल तसेच त्यांच्या वाढीला चालना देणाऱ्या उद्योगक्षेत्रांबद्दल महत्त्वाची माहिती उघड करतो.

या निष्कर्षांनुसार टीमलीज डिजिटलच्या जीसीसी भागीदारींपैकी ३१ टक्के मुंबई-पुणे भागात आहेत. या क्षेत्रात उच्च तंत्रज्ञान व ऑटोमोटिव (वाहन) ही क्षेत्रे सर्वांत महत्त्वाची आहेत, संख्येच्या निकषावर उच्च-तंत्रज्ञान (हाय-टेक) उद्योगाचा वाटा ३३ टक्के, तर वाहन ऑटोमोटिव क्षेत्राचा वाटा २२ टक्के आहे. विशेषत: पुणे भाग ऑटोमोटिव क्षेत्रात चालक म्हणून उदयाला येत आहे. या भागाचा भांडवल बाजारांमधील सहभागही लक्षणीय आहे. भांडवल बाजार या क्षेत्रात मुंबई/पुणे आणि दिल्ली एनसीआर हे भागच योगदान देत आहेत. यातून डेटा मायनिंग, प्रेडिक्टिव अॅनालिटिक्स आणि बिग डेटा फ्रेमवर्क्सवर प्रकाश टाकला आहे.

बेंगळुरू हेही जीसीसीचे महत्त्वाचे केंद्र असल्याचे या संशोधनात आढळले. टीमलीज डिजिटलच्या एकूण क्लाएंट्सपैकी ३६ टक्के बेंगळुरूमध्ये आहेत. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे उच्च-तंत्रज्ञान उद्योगातील वर्चस्वाचे स्थान होय. यामध्ये ३७ टक्के प्रतिभावंतांचे केंद्रीकरण आहे. बीएफएसआय आणि कन्सल्टिंग (सल्लागार) कंपन्यांचा समावेश असलेल्या प्रोफेशनल सर्व्हिसेसचा क्रमांक त्यापाठोपाठ आहे, संख्येच्या निकषावर या कंपन्यांचा वाटा २१ टक्के आहे.

उत्पादन क्षेत्रही महत्त्वाचा घटक म्हणून उदयाला येत आहे, एकूण संख्येत या क्षेत्राचा वाटा १० टक्के आहे. ऑटोमोटिव व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपन्यांचे या वाढीत सर्वाधिक योगदान आहे. हाय-टेक एक उद्योगक्षेत्र म्हणून, इलेक्ट्रॉनिक्स, आरोग्यसेवा, ई-कॉमर्स, सेमीकंडक्टर, ईव्ही, विमान वाहतूक व संरक्षण आणि ईआरअँडडी अशा सर्व क्षेत्रांना, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यावर   लक्ष केंद्रित करत आहे.

आर्थिक वर्ष २५च्या पहिल्या दोन तिमाहींमध्ये टीमलीज डिजिटलच्या क्लाएंट्समध्ये हैदराबादमधील क्लाएंट्सचा वाटा १४ टक्के असल्याचेही या निष्कर्षांमधून दिसून येते. या शहरामध्ये हाय-टेक उद्योगक्षेत्र जोमाने वाढत आहे, जीसीसींच्या संख्येमध्ये त्याचे योगदान ४५ टक्के आहे. हैदराबादची जीसीसी अत्याधुनिक डिजिटल रूपांतरणात अग्रेसर आहेत.

जागतिक स्तरावरील कामकाज सुधारण्यासाठी जीसीसी क्लाउड कम्प्युटिंग, एआय, ब्लॉकचेन व डेटा अॅनालिसिसमधील प्रगतीचा लाभ घेत आहेत. स्वयंचलन (ऑटोमेशन) आणि रोबोटिक्स व ब्लॉकचेनसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर हैदराबादमधील जीसीसी लक्ष केंद्रित करत आहेत. यातून तंत्रज्ञानात्मक नवोन्मेषाच्या क्षेत्रातील हैदराबादची भूमिका अधोरेखित होते.

त्यानंतर दिल्ली-एनसीआर जीसीसींच्या एकंदर संख्येत २२ टक्के योगदान देते. या संख्येत सॉफ्टवेअर व प्लॅटफॉर्म आणि हाय-टेक क्षेत्रांचा वाटा प्रत्येकी २० टक्के आहे. या भागाचे वेगळेपण म्हणजे तेल व नैसर्गिक वायू उद्योगाला दिले जाणारे भरीव योगदान होय. जीसीसींच्या एकूण संख्येमध्ये या क्षेत्राचा वाटा ६.५ टक्के आहे. मागणी असलेल्या महत्त्वाच्या कौशल्यांमध्ये एडब्ल्यूएस, अॅझ्युर, डेटा मॉडेलिंग व आयओटी प्लॅटफॉर्म्सचा समावेश होतो, यातून प्रगत डिजिटल सोल्युशन्सवर या विभागाद्वारे दिला जाणारा भर दिसून येतो.

टीमलीज डिजिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीती शर्मा म्हणाल्या, “गेल्या काही वर्षांमध्ये ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसी) सर्व उद्योगक्षेत्रांमध्ये नवोन्मेष व रोजगार निर्मितीची शक्तीस्थाने म्हणून उदयाला आली आहेत. विशेषत: हाय-टेक व वाहन उद्योग जोमाने वाढत असलेल्या मुंबई आणि पुणे भागात तर जीसीसी खूपच मोठी भूमिका निभावत आहेत. जीसीसींची उत्क्रांती सातत्याने सुरू असतानाच आमचा त्यांच्यासोबतचा सहयोगही मुंबई/पुणे आणि अन्य भागांमध्ये वाढत आहे. वैशिष्ट्यपूर्ण कौशल्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी तसेच एका बाजूने नवीन कार्यांची निर्मिती करण्यासाठी हे उपयुक्त ठरत आहे.

आरोग्यसेवा, बीएफएसआय आणि रिटेल या क्षेत्रांनी लक्षणीय वाढ साध्य केली आहे. २०२१ व २०२३ यादरम्यान या क्षेत्रांनी ३० टक्क्यांहून अधिक एकत्रित संयुक्त वाढ दर अर्थात सीएजीआरची नोंद केली आहे. याच काळात एकंदर माहिती तंत्रज्ञान उद्योगक्षेत्रात मंदीची लक्षणे होती ही बाब लक्षात घेतली तर ही वाढ विशेषत्वाने लक्षणीय आहे.

याउलट, जीसीसी सॉफ्टवेअर व इंटरनेट क्षेत्राने स्थिर प्रगती साध्य केली आहे आणि २०२७ सालापर्यंत हे क्षेत्र ६.२ टक्के सीएजीआर गाठेल, असा अंदाज आहे. त्याहून अधिक आश्वासक कामगिरी रिटेल व ई-कॉमर्समधील जीसीसींनी केली आहे. हे क्षेत्र ८.४ टक्के सीएजीआरवर सशक्त वाढ साध्य करणार असे अपेक्षित आहे त्याखालोखाल आरोग्यक्षेत्रात ७.५ टक्के दराने वाढ होईल असा अंदाज आहे.

या चढत्या कमानीतून जागतिक मनुष्यबळातील गतीशील स्थित्यंतर दिसून येते. जीसीसींना सर्वांत अनुकूल टेक स्टाफिंग व लर्निंग सोल्युशन्स पुरवून या वाढीत सहाय्य करण्यासाठी टीमलीज डिजिटल उत्तम स्थितीत आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञाने किंवा नवीन बाजारपेठा यांनी प्रस्तुत केलेल्या वाढीच्या स्पर्धात्मक तरीही वैशिष्ट्यपूर्ण संधी हाताळण्यासाठी कंपनी निश्चितपणे सज्ज आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget