एक्स्प्लोर

HDFC bank: एकीकडे बाजारात मंदीच्या चर्चा अन् दुसरीकडे HDFC बँकेचा मोठा निर्णय, बचत खात्यावरील व्याजदर घटवला

HDFC bank saving interest rates: रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करुन तो 6 टक्क्यांवर आणला होता. बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवीवरील व्याजदर कमी केले आहेत.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये उलथापालथ सुरु असताना भारतातील प्रमुख खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. HDFC बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. HDFC बँकेत आता बचत खात्यात पैसे ठेवल्यास ग्राहकांना 2.75 टक्के इतकेच व्याज मिळणार आहे. HDFC बँकेने बचत खात्याचा व्याजदर ICICI आणि Axis बँकेतील बचत खात्याच्या व्याजदरापेक्षा कमी केल्याने ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे बचत खात्यात पैसे साठवून ठेवणे हे फारसे फायदेशीर नसेल.

HDFC बँकेने बचत खात्याच्या व्याजदरात 25 बेसिस पॉईंटने कपात केली, त्यामुळे हा व्याजदर 2.75 टक्के इतका झाला आहे. 12 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँकांकडून आपल्या निधी खर्चात कपात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. HDFC बँकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने यंदाच्या वर्षात रेपो दरात सलग दुसऱ्यांदा कपात केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जून 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात बाजारपेठेत मोठ्याप्रमाणावर रोख तरलता (Cash Liquidity) असूनही HDFC बँकेने बचत खात्यांवरील व्याजदर घटवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एचडीएफसी बँकेने बचत खात्यावरील व्याजदर घटवला आहे. याविषयी ग्राहक आणि आर्थिक विश्वास काय पडसाद उमटतात, हे पाहावे लागेल. 

एचडीएफसी बँकेच्या या निर्णयामुळे आता त्यांचा बचत खात्यावरील व्याजदर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेच्या व्याजदराच्या आसपास पोहोचला आहे. या दोन्ही बँका गेल्या दोन वर्षांपासून बचत खात्यावर फक्त 2.70 टक्के व्याज देत आहेत. तर बँक ऑफ बडोदात बचत खात्याचा व्याजदर 2.75 टक्के इतका आहे. HDFC बँकेने 2023 मध्ये HDFC लिमिटेडचे अधिग्रहण केले होते. तेव्हापासून बँकेचा डिपॉजिट बेस और क्रेडिट डिपॉजिट रेशोमध्ये मोठी तफावत निर्माण झाली होती. जुलै 2023 मध्ये सीडी रेशो 100 टक्क्यांच्या वर गेला होता, तो आता 98 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मात्र,  पूर्वीच्या 85-87% या स्तरापेक्षा आताचा सीडी रेशो जास्त आहे.

HDFC बँकेने सेव्हिंग अकाऊंटवरील व्याजदर घटवल्याने काय होणार?

HDFC बँकेने बचत खात्यांवरील व्याजदर घटवल्याने बाजारपेठेत अधिक भांडवल येईल, असे घडणार नाही. कारण अलीकडच्या काळात ग्राहकांना बचत खात्याच्या व्याजदरांशी फारसे देणेघेणे नसते. मात्र, यामुळे बँकेच्या एकूण निधीत कपात होऊ शकतो. कारण HDFC बँकेकडे असणाऱ्या एकूण डिपॉझिटमध्ये 34 टक्के CASA खात्यांचा समावेश आहे. त्यापैकी 69 टक्के रक्कम ही बचत खात्यांमधील आहे. हा आकडा जवळपास 6 लाख कोटींच्या घरात आहे. 

आणखी वाचा

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला, बँकाही कर्जाचे व्याजदर कमी करणार? तुमचा होम लोनचा हप्ता किती रुपयांनी कमी होणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, जानेवारीचे 1500 रुपये देण्यास मज्जाव, निवडणूक आयोगाचा निर्णय
मोठी बातमी, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, जानेवारीचे 1500 रुपये देण्यास मज्जाव
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
Embed widget