देशात अन्नधान्याचं उत्पादन किती होणार? कोणत्या पिकाचं सरकारनं किती ठेवलं उद्दीष्ट
केंद्र सरकारनं (Central Govt) अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठरवलं आहे. सरकारनं 2024-25 या पीक वर्षासाठी 340.40 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे (Food production) उद्दिष्ट ठेवलं आहे.
Agriculture News : केंद्र सरकारनं (Central Govt) अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठरवलं आहे. सरकारनं 2024-25 या पीक वर्षासाठी 340.40 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे (Food production) उद्दिष्ट ठेवलं आहे. यामध्ये खरीप हंगामातील 159.97 दशलक्ष टन, रब्बी हंगामातील 164 दशलक्ष टन आणि इतर हंगामातील 16.43 दशलक्ष टन उत्पादनाचा समावेश आहे. जाणून घेऊयात कोणत्या पिकाचं किती उद्दीष्ट ठेवलं आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती.
तांदळाचे 136.3 दशलक्ष टन तर गव्हाचे 115 दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दीष्ट
भारत सरकारनं 2024-25 या पीक वर्षासाठी 340.40 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवलं आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, तांदळाचे एकूण उत्पादन 136.3 दशलक्ष टन, गहू 115 दशलक्ष टन, डाळीचे 29.90 दशलक्ष टन, तेलबियांचे 44.75 दशलक्ष टन आणि धान्यांसह भरडधान्यांचे उत्पादन 2.95 दशलक्ष टन इतके निश्चित करण्यात आले आहे. कडधान्यांमध्ये 4.50 दशलक्ष टन, उडीद 3.05 दशलक्ष टन, मूग 4.25 दशलक्ष टन, हरभरा 13.65 दशलक्ष टन आणि मसूर पिकाचे 1.65 दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर खरिपातून 9.5 दशलक्ष टन आणि रब्बीतून 18.15 दशलक्ष टन कडधान्ये खरेदी करण्याचे सरकारने नियोजन केले आहे.
कोणत्या पिकासाठी किती उद्दीष्ट?
मिळालेल्या माहितीनुसार, मक्याचे उत्पादन 38.85 दशलक्ष टन आणि बार्लीचे 2.25 दशलक्ष टन इतके निर्धारित करण्यात आलं आहे. या दोन्ही पिकांमध्ये भरड धान्याचा समावेश होतो. दुसरीकडे, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि इतर बाजरीसह श्रीअण्णा उत्पादनाचे लक्ष्य 18.10 दशलक्ष टन आहे, त्यापैकी 14.37 दशलक्ष टन खरीप हंगामासाठी उद्दिष्ट आहे, तर रब्बीसाठी 2.6 दशलक्ष टन आहे. तर कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट 35 दशलक्ष गाठींचे आहे.
तेलबियांचे किती उत्पादन करण्याचे उद्दीष्ट?
तुरीच्या डाळीचे 4.50 दशलक्ष टन, उडीद 3.05 दशलक्ष टन, मूग 4.25 दशलक्ष टन, हरभरा 13.65 दशलक्ष टन आणि मसूर पिकाचे 1.65 दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरिपातून 9.5 दशलक्ष टन आणि रब्बीतून 18.15 दशलक्ष टन कडधान्ये खरेदी करण्याचे सरकारने नियोजन केले आहे. याशिवाय खरीप हंगामात 28.37 दशलक्ष टन आणि रब्बी हंगामात 15.03 दशलक्ष टन र इतर हंगामात 1.35 दशलक्ष टन तेलबियांचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे. तेलबियांमध्ये, मोहरीचे (रब्बी पीक) उत्पादन 13.8 दशलक्ष टन, भुईमूग 10.65 दशलक्ष टन, सोयाबीन 15.8 दशलक्ष टन असे सरकारचे लक्ष्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट 170 किलोच्या 35 दशलक्ष गाठी ठेवण्यात आलं आहे. तर 470 दशलक्ष टन उसाचे उत्पादन करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pulses Price Hike: एका वर्षात तूर डाळ 27 टक्क्यांनी महागली; डाळींची अजून भाववाढ होण्याची शक्यता