एक्स्प्लोर

जानेवारीत महागाईचा दर घटला, एप्रिलमध्ये कर्ज स्वस्त होणार, आरबीआय रेपो रेट पुन्हा घटवण्याची शक्यता

Inflation Rate : जानेवारी  2025 मध्ये किरकोळ महागाई दरात घसरण झाली आहे. महागाईचा दर 4.3 टक्क्यांवर घसरला आहे. यामुळं कर्ज आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवलं आहे. 

Retail Inflation News Update नवी दिल्ली: जानेवारी  2025 महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरण झाल्यानं सर्वसामान्यांना आणखी दिलासा मिळू शकतो. एप्रिल महिन्यात आरबीआच्या पतधोरण विषयक समितीची बैठक पार पडेल. या बैठकीत रेपो रेट कमी करण्यासंदर्भातील निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता आहे.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी 7 फेब्रुवारीला रेपो रेट कमी करण्याची घोषणा केली होती. रेपो रेट 6.50 वरुन 0.25 बेसिस पॉईंटनं घटवून 6.25 टक्के करण्यात आला.आरबीआयनं रेपो रेट कमी केल्यानं कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. 

एप्रिलमध्ये कर्ज स्वस्त होणार

जानेवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. महागाईचा दर 4.3 टक्क्यांवर आला आहे. एप्रिल 2025 पासून नवं आर्थिक वर्ष सुरु होत आहे. एप्रिल महिन्यात आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीची बैठक  होणार आहे. या बैठकीत महागाईतील घसरणीचा अंदाज घेत रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय होऊ शकतो. सध्या रेपो रेट 6.25 टक्के इतका आहे. 

जानेवारी महिन्यात भाजीपाल्याच्या दरात घसरण झाल्यानं महागाई घटली आहे. चांगल्या रब्बी हंगामामुळं महागाईचा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. 

नाईट फ्रँक इंडियाचे राष्ट्रीय संचालक  विवेक राठी  यांनी आरबीआयनं फेब्रुवारीच्या पतधोरण समितीच्या आढावा बैठकीनंतर  25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. महागाईच्या दरातील वाढीच्या शक्यतेमुळं आरबीआयनं रेपो रेट मध्ये कपात केली होती. मात्र, त्यापूर्वीच्या 7 तिमाहीमध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागरिकांची क्रयशक्ती वाढावी यासाठी व्याज दर कपातीचा निर्णय आरबीआयनं घेतला होता. 

एप्रिलमध्ये रेपो रेट घटणार

रायन्सेस प्रायवेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ संजय कुमार यांनी सीपीआय महागाई निर्देशांक 5 टक्क्यांच्या खाली आला आहे, असं म्हटलं. खाद्य पदार्थातील किमती घटल्यानं ही स्थिती पाहायला मिळतेयं. खाद्य पदार्थाच्या किमतीवरील नियंत्रण कायम ठेवून  विक्री  वाढवण्याचा प्रयत्न आहे. किरकोळ महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत असल्यानं व्याज दरात कपात शक्य असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

केअरएज रेटिंग्सच्या चीफ अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा यांनी चौथ्या तिमाहीत आणि येत्या आर्थिक वर्षात 2025-26 मध्ये महागाईचा दर 4.4 ते  4.5 टक्क्यांवर राहणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये 25 बेसिस पॉईंटनं रेपो रेट कमी होऊ शकतात. आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये महागाईचा दर वाढल्यानंतर नोव्हेंबर अन् डिसेंबरमध्ये घसरण झाली आहे. जानेवारीत देखील महागाईच्या दरात घसरण झाली आहे. सर्व गोष्टींचा विचार करता 2024-25मध्ये महागाईचा दर 4.8 टक्के राहील. चौथ्या तिमाहीत 4.4 टक्के महागाईचा दर राहू शकतो. 

इतर बातम्या :


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget