Gold Silver Price | सोन्या-चांदीला झळाळी, सोने 530 रुपयाने तर चांदी 1400 रुपयांनी वधारली
Gold Silver Price : मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 43,900 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,900 रुपये इतका आहे. चांदीच्या दरात 1400 रुपयांची वाढ झाली आहे.

मुंबई : शुक्रवारी संध्याकाळी बाजार बंद होताना मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 530 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 1400 रुपयांची वाढ झाल्याचं पहायला मिळालंय. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 43,900 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,900 रुपये इतका आहे. गेले काही दिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होतं असल्याचं पहायला मिळतंय.
चांदीच्या दरात गुरुवारच्या तुलनेत तब्बल 1400 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 65,000 रुपये मोजावे लागणार आहेत. गुरुवारी हा दर 63,600 रुपये इतका होता. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव हा 67,500 इतका होता, तर 31 मार्चला तो 65,500 रुपये इतका होता. .
गेल्या दहा दिवसांचा विचार करता 24 तारखेला सोन्याची किंमत 1020 रुपयांनी वाढली होती त्यानंतर मंगळवारी 640 रुपयांची वाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा 530 रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आलंय. अन्यथा इतर दिवशी सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट झाली आहे. गेल्या महिन्यात, 28 फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा 45,930 रुपये इतका होता तर 31 मार्चला तो 44,370 रुपये इतका होता.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास 12 हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :
- Forex Reserve | देशाचा परकीय चलन साठा 2.986 अब्ज डॉलरने घसरला, RBI चा अहवाल
- Assam EVM Issue: आसाम येथे भाजप उमेदवाराच्या गाडीत आढळले EVM, निवडणूक आयोगाकडून 4 अधिकारी निलंबित
- Hop-Shoots Cultivation | 'या' भाजीच्या एका किलोची किंमत आहे तब्बल एक लाख रुपये, बिहारच्या तरुणाचा अनोखा प्रयोग
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या






















