Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदीच्या दरात किंचित वाढ; वाचा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,810 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today : सध्या सगळीकडे लग्नसराईला सुरुवात झाली आहे. ग्राहकांची या निमित्ताने सोने खरेदीही सुरु आहे. अशातच बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate) दररोज कमी-जास्त होत असतात. मात्र, आज सोन्याचे दर पाहिल्यास हे दर काहीसे स्थिर आहेत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,810 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 62,380 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,810
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,409
1 किलो चांदीचा दर - 62,380
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,810
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,409
1 किलो चांदीचा दर - 62,380
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,810
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,409
1 किलो चांदीचा दर - 62,380
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,810
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,409
1 किलो चांदीचा दर - 62,380
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,710
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,318
1 किलो चांदीचा दर - 62,290
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 52,730
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 48,336
1 किलो चांदीचा दर - 62,310
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज खरेदीचे संकेत, तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी वधारले