Gold Rate Today : सोन्याचे दर 50 हजारांच्या खाली, तर चांदीही झाली स्वस्त, काय आहेत ताजे दर ?
Gold Rate Today : आज 22 कॅरेट सोन्याच्या दर 50 हजारांच्या खाली व्यवहार करत आहे. तर चांदीही किंचित प्रमाणात स्वस्त झाली आहे.
Gold Rate Today : गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2022) शुभमुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण कायम आहे. ऐन सणवाराला महिलांना दागिने घेण्याची फार हौस असते. अशा वेळी ग्राहकांसाठी सोने खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. आपण गेले काही दिवस पाहात आहोत की सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरुच आहे. आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.
सोन्या - चांदीचे आजचे दर :
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) वर सोन्याचे फ्युचर्स 0.36 टक्क्यांनी किंवा 189 रुपयांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचे दर 51,977 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 47,650 रूपये आहे. चांदीचे दर 0.35 टक्क्यांनी घसरून 238 रुपये प्रति किलो 67,249 रुपयांवर व्यवहार करत आहे. भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने 51,484 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले गेले, तर चांदीचा दर 66,990 रुपये प्रति किलो होता.
जागतिक बाजारपेठेतील दर :
स्पॉट गोल्ड 0116 GMT नुसार 0.2 टक्क्यांनी घसरून $1,934.10 प्रति औंस होता. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.7 टक्क्यांनी घसरून $1,940.20 वर आले. या आठवड्यात धातू सुमारे 1.1 टक्क्यांनी घसरला आहे.
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Himalaya : हिमालया कंपनीच्या प्रोडक्ट्समध्ये हलालचा वापर? #BoycottHimalaya होतोय ट्रेंड, फोटो व्हायरल
- आजपासून आपल्या आयुष्यात बरंच काही बदलतंय... निर्बंधमुक्ती, टॅक्ससह नेमकं काय काय बदललं, एका क्लिकवर वाचा
- सिडकोचा धमाका, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जम्बो लॉटरी, केवळं घरंच नाही तर भूखंड आणि गाळ्यांची महायोजना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha