एक्स्प्लोर

Gold Rate : 1 लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर सोने दरवाढीला ब्रेक, सोन्याची भाववाढ कशामुळं थांबली? प्रमुख कारणं जाणून घ्या

Gold Rate : 2025 हे वर्ष सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरलं आहे. सोने दरानं काही दिवसांपूर्वी 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि भारतीय बाजारापेठांमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 22 एप्रिलला सोन्याच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. तज्ज्ञांनी यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणं सोन्याचे दर 1 लाख रुपयांचा टप्पा अक्षय तृतीयेला पार करतील अशी आशा होती. मात्र, 22 एप्रिललाच  सोन्याच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. मात्र, त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. इंडियन बुलियन असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीनुसार आज (29 एप्रिलला) सोन्याच्या दरात 0.8 टक्के घसरण झाली. सोन्याचे दर  प्रति 10 ग्रॅम 95560 रुपयांवर पोहोचले आहेत. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या दरात 1 टक्के घसरण झाली आहे. स्पॉट गोल्डचा दर 0.8 टक्के घसरुन 3314.99 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. तर, यूएस गोल्ड फ्यूचर्सचा दर 0.7 टक्के घसरुन 3325 डॉलर प्रति औंसवर आला आहे.   

जागतिक पातळीवर सोन्याचे दर घसरले

आंतरराष्ट्रीय व्यापारातील कमी झालेला तणाव आणि जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांची सकारात्मकता यामुळं सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. अमेरिकेला भारतासह इतर देशांनी व्यापारी करारांसदर्भात सकारात्मक प्रस्ताव दिलेले आहेत, असं अमेरिकेच्या स्कॉट पेसेंट यांनी म्हटलं होतं. अमेरिका लवकरच भारतासोबत व्यापारी करार करु शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ आकारणीच्या निर्णयाला 90 दिवसांची स्थगिती दिली होती. याशिवाय काही अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ हटवण्याचा चीनचा निर्णय देखील सकारात्मक मानला जात आहे. अमेरिका आणि चीनमधील तणाव कमी होण्याचे संकेत असल्याचं मानलं जातंय. अमेरिकेकडून देखील ऑटो टॅरिफ कमी करण्यासंदर्भातील संकेत दिले आहेत.ऑटो टॅरिफ कमी केल्यानंतर व्यापारी संबंध होतील, अशी आशा जाणकारांना आहे. 

एलकेपी सिक्युरिटीजचे व्हाइस प्रेसिडेंट रिसर्च अनालिस्ट जीतन त्रिवेदी यांनी या संदर्भात बोलताना म्हटलं की व्यापारी संबंधातील तणाव कमी झाल्यानं आणि अमेरिकेनं टॅरिफ संदर्भात विविध देशांशी चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. याशिवाय चीन आणि अमेरिका यांच्यात लवकरच व्यापारी करार होण्यासंदर्भातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील तणाव कमी होण्यास मदत मिळाली आहे. याशिवाय रशिया आणि यूक्रेन यांच्यात देखील शांतता करार होण्याची शक्यता असल्यानं सुरक्षित गुंतवणुकीची भावना कमी झाली आहे. 

जेव्हा गुंतवणूकदारंची भीती कमी होईल आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून लोक सोन्यातील गुंतवणूक थांबवतील तेव्हा  सोन्याची मागणी कमी होईल. जेव्हा सोन्याची मागणी कमी होईल तेव्हा त्याचे दर घटतील. तज्ज्ञांच्या माहितीनुसा जागतिक बाजारातील मंदीची भीती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेच्या कारणानं सोन्याचे दर 3500.05 डॉलर प्रति औंस इथपर्यंत पोहोचले होते. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget