सोन्याचा दर कमी होईना! 'या' कारणामुळे लवकरच होणार 1 लाख रुपये तोळा!
सध्या जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढत आहे. आगामी काळात सोन्याचा हाच दर एक लाख रुपये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव (Gold Rate) सातत्याने वाढतोय. शुक्रवारी सोनं प्रतितोळा (10 ग्रॅम) 73174 हजार रुपयांपर्यंत पोहोचलं होतं. सध्या लग्नसराई चालू आहे. लोक या काळात सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. मात्र सोन्याच्या या भाववाढीमुळे सध्या सराफा बाजारात शुकशुकाट पाहायला मिळतोय. आगामी काळात हेच सोनं आणखी भाव खाण्याची शक्यता आहे. सोन्यासह चांदी या धातूचीही हीच स्थिती आहे. चांदीचा दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असून चांदीचा दर सध्या 83819 रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे.
राष्ट्रीय बाजारात सोन्याची स्थिती काय?
तज्ज्ञांच्या मतानुसार सध्या जागतिक पातळीवर घडत असलेल्या घटनांमुळे सध्यातरी सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता नाही. सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. या युद्धामुळेदेखील सोने-चांदीचा भाव भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर संघटना गोल्डमॅन सॅक्स या संस्थेच्या म्हणण्यानुसार जागतिक बाजारात सोन्याचा भाव या वर्षाच्या शेवटपर्यंत 2,700 डॉलर प्रति औंस पर्यंत वाढू शकतो. काही दिवसांपर्वी हाच दर 2,300 डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सोन्याच्या दरावर लक्ष ठेवणाऱ्या अन्य काही संस्था तर हाच दर 3000 डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे सांगतायत.
सोने-चांदीचा दर ऑल टाईम हाय!
फेब्रुवारी महिन्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने तेजी पाहायला मिळाली आहे. सध्या जागतिक बाजारात सोन्याचा दर हा 2,424.32 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात चारपट वाढ झाली होती. सध्या जागतिक बाजाराता सोन्याचा दर हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर (All Time High) आहे. चांदीच्या दरातही चार पटीने वाढ झाली आहे. सध्या चांदीचा दर हा 29.60 डॉलर प्रति औंस झाला असून तो 2021 सालानंतरचा सर्वाधिक दर आहे.
सोन्याचा भाव एक लाख होणार?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्या देशात सोन्याचा भाव हा 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा जास्त झाला आहे. चांदीचा भावदेखील 83 हजार रुपये प्रति किलोग्रॅमपेक्षा अधिक झाला आहे. इस्रायल-इराण युद्धाची स्थिती तसेच अन्य जागतिक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात अशीच स्थिती राहिल्यास आगामी वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत सोन्याचा दर हा एक लाख रुपये प्रति 10 ग्रॅम होऊ शकतो. सोन्यासह चांदीचा दरदेखील एक लाख रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
हो खरंय! सरकारची 'ही' योजना महिलांना दोन वर्षांत श्रीमंत करणार, करही वाचणार; एकदा वाचाच!
दिवसाची रात्र अन् रात्रीचा केला दिवस, पठ्ठ्या वडापाव विकून झाला कोट्यधीश, वाचा संघर्षमय कहाणी!